नवी दिल्ली: अनेक जण सोन्यात (Gold) गुंतवणूक करतात. भविष्यात सोन्याचे भावात चढउतार होण्याची शक्याता पाहता ते आधीच खरेदी करून ठेवणारे बरेच असतात. या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाही मागे नाही. आरबीआयने (Reserve Bank Of India) सोने खरेदीचा जणू सपाटाच लावला आहे. ताज्या माहितीनुसार, आरबीआयने वाढत्या महागाई आणि जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सोन्यात मोठी गुंतवणूक केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात, आरबीआयने ३४.२२ टन सोने खरेदी केले आहे. त्यामुळे भारताकडे सोन्याचा एकूण साठा ७९४.६४ टन झाला आहे.
[read_also content=”इलॉन मस्क ट्विटरचे सीईओ पद सोडणार, आता एका महिलेच्या हातात देणार सर्व सूत्रे https://www.navarashtra.com/world/elon-musk-will-step-down-as-ceo-of-twitter-handing-all-the-reins-to-a-woman-nrps-398039.html”]
सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न समारंभ म्हण्टलं मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. यामुळे देशाअंतर्गत सोन्याच्या उलाढालीत मोठा बदल पाहायला मिळतो. तसेच प्रत्येक देशाची सेंट्रल बँक सोन्याची साठवणूक करते. सोन्याचा उपयोग हेज फंड म्हणून केला जातो. आता रिझर्व्ह बँकेनेही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले आहे. त्यामुळे वर्षभरात देशातील सोन्याच्या साठ्यात सुमारे ५% वाढ झाली आहे. भारताच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यातील सोन्याचा हिस्सा मार्च २०२३ मध्ये ७.८१ टक्के झाला आहे.
तुर्की १४०.९
चीन १२०.१
सिंगापूर ६८७
उझबेकिस्तान ४३.९
भारत ३४.२
इराक ३३.९
गेल्या ५ वर्षामध्ये आरबीआयने सोने खरेदीत सतत वाढ केली आहे. एकूण सोन्याच्या साठ्यापैकी ४३७.२२ टन सोने परदेशात बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातच ३०९.१० टन सोने ठेवण्यात आले आहे.