नवी दिल्ली – मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अडचणीत सापडलेल्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने आज दिलासा दिला आहे. नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका मागे घ्यावी, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने ही सूचना केली आहे.
प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले होते. त्यांच्याविरोधात मुस्लिम समाजातून संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाने देशभरात वातावरण तापले होते. त्यांच्या अटकेची मागणी करीत सुप्रिम कोर्टात याचिका दाखल झाली होती.