उत्तराखंडमधील उत्तरकाशी (Uttarkashi) ऐन दिवाळीच्या दिवशी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव दरम्यान बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा काही भाग पहाटे अचानक फुटला, त्यामुळे त्यात काम करणारे सुमारे 40 कामगार आत अडकले. या दुर्घटनेला २४ तासांहून अधिक काळ लोटला असून,सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ढिगारा हटवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. बचाव पथकाकडून बोगद्याचा ढिगारा हटवण्यात येत आहे. आतापर्यंत ६० मीटरपर्यंतचा ढिगारा हटवण्यात आला असून ३० ते ३५ मीटरचा ढिगारा शिल्लक आहे.
[read_also content=”पूर्व वैमन्यस्यातून एका कुटुंबातील चौघांची हत्या, आईसह तीन मुलांना संपवलं, हल्लेखारांनी 12 वर्षाच्या मुलालाही सोडलं नाही! https://www.navarashtra.com/crime/4-people-of-same-family-killed-in-karnataka-udapi-nrps-480371.html”]
ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. सध्या सर्व कामगार सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या पाइपलाइनद्वारे कंप्रेसरद्वारे दाब निर्माण करून रात्री बोगद्यात अडकलेल्या कामगारांना हरभऱ्याची पाकिटे पाठवण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुहेला यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आणि बचाव कार्याला गती देण्यास सांगितले. रुहेला यांनी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्या रद्द केल्या आहेत. सीएम धामी यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ मी उपस्थित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मी त्यांना बचाव कार्याला गती देण्यास सांगितले आहे. मी प्रार्थना करतो की प्रत्येकजण सुखरुप बाहेर यायला हवं.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा ते दंडलगाव या मार्गावर बोगद्यातं बांधकाम सुरू आहे. रविवारी पहाटे चारच्या सुमारास बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळला. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनच्या वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफचे बचाव पथक रवाना करण्यात आले आहे.