व्यसन (Addiction) ही एक अशी गोष्ट आहे की ती एकदा तुम्हाला लागलं की तुम्ही त्यापासून तुमची सुटका सहजासहजी होऊ शकत नाही, कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी त्यातून सुटका होत नाही. आणि जर हे व्यसन अंमली पदार्थाच असेल तर मग ते सोडवणं फार अवघड असंत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यसनाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये नशा करण्यासाठी लोक चक्क विंचूचा वापर करतात. चरस आणि गांजापेक्षा विषारी प्राण्यांची नशा अधिक शक्तिशाली आहे. विंचू पाहिलं तरी आपण भितीने किंचाळतो तर काही देशात हे लोकं कशा पद्धतीने विंचूची नशा करतात जाणून घ्या.
[read_also content=”तुर्कीमध्ये पुन्हा भूकंप! 4.7 तीव्रतेची नोंद, मागील भूकंपबळीचा आकडा 33000 पार https://www.navarashtra.com/world/earthquake-occurred-again-in-turkey-of-4-7-richter-scale-nrps-369323.html”]
वास्तविक, पाकिस्तानचा पख्तुनख्वा प्रांत असा आहे जिथे गांजा, अफू आणि चरस मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र काही गावातील लोक या जुन्या पद्धतीला कंटाळले आहेत. त्यामुळेच आता त्यांनी अशाप्रकारे प्राणी कीटक यांची नशा करायला सुरुवात केली आहे. आता ते विंचू मारल्यानंतर मद्यपान करत आहेत. विषारी प्राण्यांचा नशा, जो गांजा आणि हेरॉइनपेक्षा खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे लोक विंचू पकडून मारतात आणि उन्हात वाळवतात. वाळल्यानंतर त्याची पावडर बनवून ती कागदात भरून धुम्रपान करतात. कर दुसऱ्या पद्धतीने ते जीवंत विंचूला जाळतात त्यानंतर त्याच्या धुव्याने नशा करतात. ज्या लोकांना याची सवय होते तो सगळ्यात जास्त विंचूच्या शेपुटची मागणी करतात . कारण विंचूच्या शेपूट
तज्ञांच्या मते विंचूची नशा केलेल्या व्यक्तीवर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. चेहरा पूर्णपणे लाल होतो आणि नशा करणाऱ्यावर सुमारे 10 तास याचा प्रभाव राहतो. कर, विंचूची नशा केल्याने स्मृती भ्रंश होण्याची शक्तया असते. यामुळे स्मरणशक्तीही कमी होऊ शकते. विंचूच्या विषामध्ये आढळणारे औषध अत्यंत विषारी असते, त्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो.
ज्याप्रमाणे विंचूच्या विषामुळे नुकसान होतं त्याचप्रमाणे विंचुच्या विषाचे फायदे सुद्धा आहेत. विंचूच विष औषध म्हणूनही वापरलं जातं. कॅास्मेटिक, पेनकिलर, आणि अँन्टिबायोटिक बनवण्यात विंचूचा वापरे केला जातो.