बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतो. अलीकडेच त्याने खुलासा केला आहे की त्याला ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये किंग खानने हॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत स्पष्टपणे बोलला. शाहरुखने सांगितले की, डॅनी बॉयलने त्याला या भूमिकेची ऑफर दिली होती, परंतु त्याने ती करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही भूमिका अनिल कपूरला मिळाली.
[read_also content=”लाईव्ह कान्सर्टदरम्यान फॅनचा फोन गर्दीत फेकला, ट्रोल झाल्यावर आदित्य नारायणनं दिलं ‘हे’ उत्तर! https://www.navarashtra.com/movies/aditya-narayan-reacts-on-incident-to-hitting-fan-throwing-his-phone-away-during-concert-know-what-he-says-507027.html”]
शाहरुख खान म्हणाला, मी मिस्टर बॉयलसोबत खूप वेळ घालवला आहे. तो खूप गोड आहे, पण मी त्यावेळी टेलिव्हिजनवर कौन बनेगा करोडपती शो करत होतो. शिवाय, जी गोष्ट सांगितली जात होती, त्या कथेत जो होस्ट होता, ती व्यक्ती खूप क्षुद्र आहे असे मला वाटले. कौन बनेगा करोडपतीच्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी त्याच्या नावाची शिफारस केली होती. असेही त्याने सांगितले. पण ही भूमिका करण्यात त्याला रस नव्हता. कारण चित्रपटात होस्टला अप्रामाणिक व्यक्ती दाखवण्यात आली होती.
पुढे किंग खान म्हणाला, ‘चित्रपटात माझ्या भुमिका करणाऱ्याला अप्रामाणिक दाखवण्यात आलं होत. त्यामुळे मला हे खूप विचित्र वाटलं की मी होस्ट आहे आणि मी चित्रपटात फसवणूक करत आहे. म्हणून मी मिस्टर बॉयलला समजावून सांगितले, मला हे करायला आवडणार नाही. माझ्यापेक्षा बरेच चांगले अभिनेते आहेत आणि मला वाटते की अनिल कपूरने ते केले आणि तो होस्ट म्हणून खूप चांगला होता.
हॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत बोलताना शाहरुख खान म्हणाला की, बोलणी झाली आहेत, मात्र अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव आलेला नाही. ‘मी हे प्रामाणिकपणे सांगितले आहे, पण त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. म्हणून मी तुम्हाला हे अगदी प्रामाणिकपणे सांगणार आहे. मला कोणीही कामाची ऑफर दिली नाही. मी माझ्या ओळखीच्या लोकांशी बोलले असेल, पण मला कोणीही चांगले काम दिले नाही.






