वाईत 'अश्विना डायलिसिस सेंटर'चे शानदार उद्घाटन;
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव शिवाचार्य महाराज वाईकर होते. यावेळी पत्रकार विकास जाधव, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. रूपाली पवार, डॉ. स्नेहल शिंगटे, डॉ. नाज मकानदार, डॉ. आकांक्षा गायकवाड, श्रीकांत वालेकर, सोमनाथ आप्पा राऊत आणि विशाल गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सेवाभावी प्रकल्पांची गरज अधोरेखित केली.
महादेव शिवाचार्य महाराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, Dattatray Pandurang Menbudale Pratishthan च्या माध्यमातून डॉ. मेणबुदले विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. समाजात ‘माणुसकी’ जपणाऱ्या व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्ती असणाऱ्या व्यक्तींची नितांत गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. महेश मेणबुदले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामीण आणि उपनगरातील अनेक रुग्णांना डायलिसिससाठी मोठ्या शहरांकडे जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. ही अडचण लक्षात घेऊन वाईमध्येच परवडणाऱ्या दरात आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. अत्यंत माफक दरात सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून, जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
CM Devendra Fadnavis: जल जीवन मिशन 2.0 साठी केंद्र आणि महाराष्ट्र शासनात करार
या नव्या डायलिसिस सेंटरमुळे वाई व परिसरातील रुग्णांना आता जवळच उपचाराची सुविधा मिळणार असून, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.






