Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काँग्रेसचा महिलाविरोधी चेहरा उघड!”; शिवसैनिक आक्रमक; राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या फोटोंना ‘जोडे मारो’ आंदोलन

आज मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शेकडो शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शने केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 18, 2026 | 03:20 PM
"काँग्रेसचा महिलाविरोधी चेहरा उघड!"; शिवसैनिक आक्रमक (Photo Credit- X)

"काँग्रेसचा महिलाविरोधी चेहरा उघड!"; शिवसैनिक आक्रमक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • “काँग्रेसचा महिलाविरोधी चेहरा उघड!”
  • शिवसैनिक आक्रमक
  • राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या फोटोंना ‘जोडे मारो’ आंदोलन
मुंबई, ता. १८ एप्रिल २०२६: लोकसभा आणि विधासभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ घटना दुरुस्ती विधेयक काँग्रेसच्या दगाबाजीमुळे मंजूर होऊ शकले नाही. काँग्रेस आणि इंडी आघाडीतील पक्षांच्या महिलाविरोधी राजकारणाचा निषेध नोंदवण्यासाठी आज मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शेकडो शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी शिवसेना नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, माजी खासदार संजय निरुपम, तृष्णा विश्वासराव, कला शिंदे, मिनल तुर्डे , अदिती खुर्संगे , निर्मिती कानडे, मानसी सातमकर, संध्या दोशी, दीक्षा करकर, वनिता नरवणकर, आशा मामिडी, संजय निरुपम, चंद्रहार पाटील, योगेश केदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नारी शक्ती वंदन अधिनियम घटना दुरुस्ती विधेयकाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते, मात्र ते नामंजूर झाले. काँग्रेस आणि इंडी आघाडीने पुतना मावशीचे प्रेम दाखवले. सुरुवातीला या विधेयकाला पाठिंबा आहे, असे सांगणारे विरोधक मतदानावेळी उलटे फिरले, अशी टीका आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली. नारी शक्ती वंदन विधेयकाबाबत मतदार संघ पुनर्रचनेचा खोटा प्रचार विरोधकांनी केला. यामुळे काँग्रेसला महिलांची मते मागण्याचा अधिकार नाही, असे डॉ. गोऱ्हे यांनी ठणकावले.

Women Reservation Bill: क्रेंद सरकारला मोठा धक्का! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, विरोधकांच्या एकजुटीने भाजपची रणनीती फेल

ज्या प्रमाणे विधीमंडळात एखाद्या विधेयकाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रणनिती आखतात. तसेच लोकसभेत विधेयकाच्या मतदानापूर्वी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांना नियोजनासाठी सहभागी केले असते तर कदाचित ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ मंजूर झाले असते, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही कधी लोकसभेत इच्छाशक्ती दाखवून महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर केले नाही, अशी टीका डॉ. गोऱ्हे यांनी केली.

काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत होती, मात्र त्यांना महिलांना आरक्षण देता आले नाही. मागील ३० वर्ष काँग्रेसच्याच आडमुठेपणामुळे महिला आरक्षण विधेयक रखडले होते, अशी टीका आमदार ड़ॉ. कायंदे यांनी केली. गोरगरिब, दलित, आदिवासी महिला लोकसभेत, विधानसभेत जाऊ नये, यासाठी काल काँग्रेस पक्षाने नारी शक्ती वंदन अधिनियमविरोघात मतदान केले. यातून काँग्रेसचा महिला विरोधी खऱा चेहरा समोर आला, अशी टीका आमदार डॉ. कायंदे यांनी केली. यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारुन उपस्थित महिलांनी आपला संताप व्यक्त केला.

Women Reservation Bill: “निवडणूक नकाशा बदलण्याचा भाजपचा डाव”, महिला आरक्षणावरुन राहुल गांधींचा सरकारवर जोरदार प्रहार

Web Title: Shiv sena protest against congress rahul gandhi women reservation bill failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Congress
  • Rahul Gandhi
  • shivsena
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

‘हे तर लोकशाहीचे सीरियल रेपिस्ट’; सहा खासदारांच्या विलिनीकरणावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
1

‘हे तर लोकशाहीचे सीरियल रेपिस्ट’; सहा खासदारांच्या विलिनीकरणावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

मोठी बातमी ! ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आता अधिकृतपणे शिंदे गटात; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
2

मोठी बातमी ! ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आता अधिकृतपणे शिंदे गटात; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi : ‘कोणतीही ताकद तुमचा आवाज दाबू…’; सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3

Rahul Gandhi : ‘कोणतीही ताकद तुमचा आवाज दाबू…’; सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.