धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जीवे मारण्याची धमकी; हातात तलवार घेऊन व्हिडीओ केला पोस्ट

आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने आपली तायरी चालू केली. सर्वच पक्षांनी आता जोरदारपणे तयारी केली आहे. असे असताना एका माथेफिरूने खुद्द पंतप्रधान मोदींनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

    Threatening to Kill PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांची तयारी सुरू असताना, कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने समाजमाध्यमांवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार अशी धमकी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वेगवेगळ्या कलमांअतर्गत गुन्हा दाखल
    पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ५०५ (१) (ब), २५ (१) (ब) तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

    आरोपी फरार, पोलिसांचा शोध चालू
    आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन भाजपने आपली तयारी चालू केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. असे असताना मोहम्मद नावाच्या या व्यक्तीने केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी दिलीय. या थेट धमकीच्या व्हिडीओमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मोहम्मद हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.