शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात 6 मुलांचा मृत्यू, चालक होता दारूच्या नशेत, ईदच्या दिवशीही सुरू होती शाळा!

हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला असून, त्यात 6 मुलांचा मृत्यू झाला आहे.

    हरियाणातील महेंद्रगड येथे भीषण अपघात (School Bus Accident) झाला असून त्यात ६ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. येथे गुरुवारी सकाळी एक स्कूल बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. बसमध्ये सुमारे 35 ते 40 मुले होती. अपघातानंतर यातील ६ मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र या दुर्देवाने या 6 मुलांचाही मृत्यू झाला.

    झाडाला धडकली बस

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना शहरात हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस एका खासगी शाळेची होती. या अपघातात सुमारे 15 मुले जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण मंत्री सीमा त्रिखा रेवाडी आणि महेंद्रगडमध्ये पोहोचून घटनास्थळी भेट दिली. सुट्टीच्या दिवशी शाळा का सुरू करण्यात आल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी बस चालकासह शाळेचे मुख्याध्यापक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

    बस चालक दारूच्या नशेत होता

    हा अपघात घडला तेव्हा काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, ज्या गावात अपघात झाला त्या ठिकाणापूर्वी मार्गावर असलेल्या गावात बस आल्यानंतर चालक दारूच्या नशेत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी तात्काळ बस थांबवली आणि चावी हिसकावून घेतली.  ऐव्हड्यावरच न थांबत गावकऱ्यांनी याबाबत शाळा व्यवस्थापनाला कळवण्यात आले. गावकऱ्यांना शाळा व्यवस्थापनाकडून फोनवर आश्वासन देण्यात आले की ते या चालकाला काढून टाकतील. तूर्तास, बस चालकाला चावी द्या. यानंतर चालक बससह तेथून निघून गेला आणि उन्हणी गावाजवळ काही अंतर गेल्यावर भरधाव वेगात असलेल्या बसचा तोल गेला आणि बस झाडावर जाऊन आदळली.