नवी दिल्ली – मेरठमधील शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला ‘आय लव्ह यू’ म्हटले. तसेच तिची वर्गात आणि रस्त्याने ये-जा करताना मुलांकडून छेड काढली जात आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्रस्त झालेल्या शिक्षिकेने अखेर पोलिस ठाण्यात तीन विद्यार्थ्यांविरूद्ध विनयभंग आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षिकेचा आरोप आहे की, त्यांच्या शाळेतील बारावीचे विद्यार्थी तिला अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत. कधी वर्गात, तर कधी रस्त्याने ये-जा करताना तिला असभ्यपणे बोलत आहेत. हे प्रकरण मेरठमधील किठोरे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इनायतपूर गावातील आहे.
सीओ किथोर सुचिता सिंह यांनी सांगितले की, शिक्षिकेच्या तक्रारीवरून, तीन आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध आयटी कायद्याअंतर्गत आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे. आरोपी असलेल्या विद्यार्थ्यांच्या बहिणींची देखील चौकशी केली जाणार आहे.
डॉ. राम मनोहर लोहिया मेमोरिअल इंटर कॉलेज राधना येथील शाळेच्या शिक्षिकेने हे आरोप केले आहे. शाळेतील बारावीतील तीन विद्यार्थी त्यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास देत आहेत. कधी वर्गात तर कधी रस्त्यात त्याची छेड काढत आहेत. कधी तो आय लव्ह यू म्हणतात तर कधी अपशब्द वापरतात.
शिक्षिकेने पोलिसांना सांगितले की, विद्यार्थ्यांना शिवीगाळ करण्यासाठी अनेकवेळा थांबवण्यात आले, समजावून सांगितले. मात्र, या तीन विद्यार्थ्यांनी त्यांचा विनयभंग करतानाचा व्हिडिओ बनवला. तो व्हायरल केला. हे सर्व प्रकरण गुरुवारी उघड झाले. हा व्हिडिओ बनवण्यात आरोपी विद्यार्थ्याच्या बहिणीचाही सहभाग असल्याचे शिक्षिकेने आरोप केला आहे.