महाशिवरात्र म्हणजे देवी पार्वती आणि महादेवांच्या विवाहाचा सोहळा मानला जातो. या दिवशी पृथ्वीवर पहिला प्रेम विवाह झाल्याचा देखील समज आहे. याच महाशिवरात्रीच्या निमित्ताने तामिळनाडूतील पार्वतीदेवीच्या मंदिराची एक रंजक दंतकथा आहे. तामिळनाडूच्या मदुराई शहरात असलेले मीनाक्षी देवी मंदिर संपूर्ण भारतात खूप खास मानले जाते.मीनाक्षी देवी ही पार्वती देवीचा अवतार असल्याचे म्हटले जाते. देवीला समर्पित असलेले २५०० वर्षे जुने मीनाक्षी देवी मंदिर 2500 वर्षे जुने आहे.मंदिरात भगवान शिव यांच्या शेजारी देवी पार्वती वास करते. देवी मीनाक्षीची मूर्ती देखील रहस्यमय आहे. खरं तर, या मूर्तीला तीन स्तन आहेत.महादेवाशी खूप खोलवर संबंध असलेल्या मीनाक्षी देवीशी संबंधित पौराणिक कथा जाणून घ्या.
मीनाक्षी देवीची आख्यायिका
मदुराईचे राजा मलयध्वज पांड्य आणि त्यांच्या पत्नीने एका भव्य यज्ञाचे आयोजन केल्याची आख्यायिका आहे.हा यज्ञ संततीची इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्यात आला होता. यज्ञामुळे राजाला कन्या रत्न प्राप्त झालं. ही जन्माच्या वेळी तीन वर्षांची होती.तिचे डोळे माशासारखे सुंदर आणि सुबक होते. आपल्या मुलीतील हे विलक्षण सौंदर्य पाहून तिच्या पालकांनी तिचे नाव मीनाक्षी ठेवले. ही मुलगी दिसायला इतर मुलींसारखी जरी असली तरी ती साधारण नव्हती. यामुलीला जन्मत: तीन स्तन होते. त्यामुळे राजा आणि राणी आपल्या मुलीबाबत दुखी होते. त्यांनी महादेवांना साकडं घातलं. महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, जेव्हा मीनाक्षीला योग्य वर मिळेल तेव्हा तिचे तिसरे स्तन नाहीसे होईल.
महादेवांनी राणीला तिच्या मुलीमधील सद्गगुण सांगितले. ते म्हणाले माते तुझी खूप धाडसी आणि साहसी आहे तिला तिचा योग्य वर नक्कीच मिळेल. महादेवांची ही वाणी खरी झाली. मिनाक्षी देवी वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा म्हणून देवदेवतांशी देखील लढाई केली. तिने जवळपासची सत्ता काबीज केली होती. एकदा मिनाक्षीदेवी वनातून जात असताना तिला एक संन्यासी भेटला. त्यानंतर असं काही झालं की, मिनाक्षी देवीच्या लक्षात आलं की आपण साक्षात पार्वतीचाच अंश आहोत. देवीला हे लक्षात आणून देण्यासाठीच महादेवांनी संन्यासाचं रुप घेतलं. आजही या देवीच सत्व मोठं आहे. शौर्य़ त्याग आणि धाडसाचं प्रतीक असलेली ही मिनाक्षी देवी तामिळनाडूच्या मदुराई शहरात स्थित आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






