मनी लॅान्ड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरमुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढण्याची चिन्ह दिसत आहे. सुकेशने आपचे नेते सत्येंद्र जैन यांना संरक्षण रक्कम म्हणून 10 कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे. या संदर्भात त्याने दिल्लीच्या गव्हर्नरांना पत्र लिहले आहे. तर, राज्यपालांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
[read_also content=”चुकीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत; दिलीप वळसे पाटील यांचा राज्य सरकारवर आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/factories-in-trouble-due-to-wrong-policy-dilip-valse-patil-alleges-against-the-state-government-nrdm-340939.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना पत्र सादर केले आहे. या पत्रात सुकेशने आपल्याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. सुकेशने आपल्या पत्रात तिहारमध्ये प्रोटेक्शन मनी दिल्याचे म्हटले आहे. सत्येंद्र जैन हे सुध्दा मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद आहेत. सुकेश चंद्रशेखर यांनी सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप केला आहे की, डीजी जेलकडून आपल्याला धमकी देण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सचा संदर्भ देत भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की एलजी व्हीके सक्सेना यांना लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखरने सांगितले की, तो 2015 पासून आप नेत्याला ओळखतात. या पत्रात पुढे म्हटले आहे की, दक्षिण भारतात आम आदमी पक्षात प्रमुख पद देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ५० कोटी रुपये दिले होते. सुकेशने सांगितले की, 2017 मध्ये माझ्या अटकेनंतर मी तिहार तुरुंगात होतो आणि सत्येंद्र जैन अनेक वेळा आले. त्यांच्या सचिवाने मला दरमहा २ कोटी रुपये संरक्षण मनी म्हणून देण्यास सांगितले होते. हे पत्र चंद्रशेखर यांनी स्वत:च्या हाताने लिहिले असून ते एलजीला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
[read_also content=”यापुढे आमच्या वाट्याला गेल्यास माफ करणार नाही, अमरावतीच्या सभेत बच्चू कडुंचा रवी राणांना इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/bacchu-kadu-criticized-on-ravi-rana-allegations-in-amravati-nrps-340929.html”]