तहव्वुर हुसेन राणा भारतात येताच मिळाली 'इतक्या' दिवसांची कोठडी; आता चौकशीचा मार्ग मोकळा होणार
मुंबई : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला अखेर भारतात आणण्यात आले. त्याला घेऊन येणारे खास विमान गुरुवारी दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. यानंतर त्याला विमानतळावरून थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेण्यात आले. तिथे तपास संस्थांच्या पथकाकडून त्याची चौकशी झाली. त्यानंतर त्याला 18 दिवसांची कोठडी मिळाली आहे.
एनआयए मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यानंतर राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाऊ शकते, असे म्हटले जात होते. मात्र, त्याला आता कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात हजर होण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली होती. त्याच्यावर खटलादेखील चालवला गेला. तहव्वुर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानुसार, तुरुंग प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्थाही केली.
पोलिस हाय अलर्टवर
राणाच्या प्रत्यार्पणाबाबत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच विमानतळावर स्वेंट कमांडोदेखील तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (सीएपीएफ) 5) सुरक्षा शाखा आणि स्थानिक पोलिस विमानतळाबाहेर दिसून आले होते.
‘या’ अधिकाऱ्यांनी आणले राणाला भारतात
राष्ट्रीय तपास संस्थेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्यापैकी एक महानिरीक्षक (आयजी) दर्जाचे अधिकारी आहे आणि दुसरे उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाच्या अधिकारी आहेत.
नरेंद्र मान सरकारी वकील
केंद्र सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. त्यांना ही जबाबदारी तीन वर्षांसाठी किंवा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत देण्यात आली आहे.
तो आमचा नव्हेच; पाकने झटकले हात
तहव्वुर राणा हा पाकिस्तानी लष्कर/आयएसआयचा सदस्य आहे. त्याचा २६/११ हल्ल्याच्या कटात थेट सहभाग होता अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता पाकिस्तानने तहव्वुर राणापासून स्वतःला दूर केले आहे. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगत परराष्ट्र कार्यालयाने निवेदनच जारी केले आहे.
राणाची 20 दिवसांची कोठडी मागणी
ज्यावेळी युक्तिवाद झाला त्यावेळी एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसांची कोठडी मागितली. राणाच्या कोठडीची कारणंही वकिलाने कोर्टासमोर मांडली. तसेच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला 18 दिवसाची कोठडी दिली आहे.