मुंबई : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस (TCS) सध्या चांगलीच चर्चेत आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी जॅाबसाठी अर्ज करतात. मात्र, या कंपनीत नोकरी भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपासून करण्यात येत आहे. या संदर्भात जून महिन्याच्या सुरुवातीला मिळालेल्या व्हिसलब्लोअर तक्रारीनंतर आता TCS ने चार कर्मचाऱ्यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.
[read_also content=”संतापजनक! लखनऊ मुंबई एक्सप्रेसमध्ये पाच पुरुषांचा लेडीज डब्यात प्रवास; महिलांनी विरोध केल्यानंतरही मुजोरी, पोलिसांची मध्यस्ती https://www.navarashtra.com/maharashtra/five-men-travel-in-ladies-compartment-in-lucknow-mumbai-express-nrps-422993.html”]
टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) के. क्रितिवासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) एन. गणपती सुब्रमण्यम यांना एका व्हिसलब्लोअरने तक्रार पाठवली होती, ज्यात त्याच्या संसाधन व्यवस्थापन गटाचे (आरएमजी) जागतिक प्रमुख ई. एस. चक्रवर्ती यांनी स्टाफिंग फर्म्सकडून वर्षानुवर्षे कमिशन घेतले असा आरोप करण्यात आला होता.
त्यानंतर कंपनीने या आरोपांची चौकशी केली. आठवड्याभाराच्या चौकशीनंतर चक्रवर्ती (RMG चे जागतिक प्रमुख) यांना रजेवर पाठवण्यात आले, भर्ती गटातील चार अधिकारी काढून टाकण्यात आले आणि तीन कर्मचारी कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले, अशी माहिती समोर आली. ‘घोटाळ्यात’ सहभागी असलेल्यांनी कन्सल्टन्सी फर्मच्या आडून किमान १०० कोटी रुपयांची लाच घेतली, असाही आरोप करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, TCS ने, कंपनीच्या भर्ती प्रक्रियेत ‘फसवणूक’ केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे “आम्ही तक्रारीत केलेल्या आरोपांची चौकशी केली आणि आरोपांमध्ये कंपनीकडून किंवा विरुद्ध कोणतीही फसवणूक आणि आर्थिक प्रभावाचा समावेश नाही. कथित घोटाळ्याचा संदर्भ चुकीचा आहे असे आम्हाला आढळून आले, असं म्हण्टलं आहे.
“आमच्या कोणत्याही प्रमुख व्यवस्थापकीय पदांवर कोणत्याही अनियमिततेचा समावेश नाही. हा मुद्दा विशिष्ट कर्मचार्यांकडून आणि कर्मचारी संस्थांकडून आचारसंहितेच्या उल्लंघनाशी संबंधित आहे,” असे त्यांनी पुढे म्हटले. गेल्या तीन वर्षांत TCS ने जवळपास तीन लाख तरुणांना नोकरी दिली असून सध्या कंपनीत ६ लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.