Rahul Gandhi News: राहुल गांधीवर दुहेरी नागरिकत्वाचा आरोप? न्यायालयात आज निर्णायक सुनावणी
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूतील नेहरू नगर येथील रहिवासी एस. विघ्नेश शिशिर यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत एमपी-एमएलए न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एमपी-एमएलए मॅजिस्ट्रेट कोर्टाचे पीठासीन अधिकारी डॉ. विवेक कुमार यांनी कोतवाली नगर पोलिसांकडून अहवाल मागवला. कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
मोठी बातमी ! TET प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार; सरकारकडून घेण्यात येणार ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर ब्रिटिश आणि भारतीय दुहेरी नागरिकत्व असल्याचा आणि रायबरेलीचे खासदार असताना बनावट पासपोर्ट बाळगल्याचा आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना शत्रू देशाला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रायबरेलीतील प्रकरणात मॅजिस्ट्रेटने खटला ‘विविध प्रकरण’ म्हणून नोंदवण्याचे निर्देश देत कोतवाली नगर पोलिसांकडून अहवाल मागवला होता. पोलिसांनी अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर, आरोपी एस. विघ्नेश शिशिर कडक सुरक्षेत वकिलासह न्यायालयात हजर झाले. याचिकाकर्त्याच्या वकिलाने सुनावणीदरम्यान अनेक कागदपत्रे सादर केली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील तारीख १२ डिसेंबर निश्चित केली.
सर्व प्रभागातील सर्व गटातून लढण्याची आमची तयारी, पण…; रवींद्र धंगेकरांनी स्पष्टच सांगितलं
राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि दिल्ली पोलिसांना एका पुनर्विचार याचिकेवर त्यांचे उत्तर मागण्यासाठी नोटीस बजावली आहे. ३० एप्रिल १९८३ रोजी नागरिकत्व मिळवण्यापूर्वी सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या कथित अनियमिततेला आव्हान देणारी ही याचिका आहे. १९८० च्या नवी दिल्ली मतदार यादीत त्यांचे नाव कसे आले, १९८२ मध्ये ते का काढून टाकण्यात आले आणि त्यांना समाविष्ट करण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरली गेली का, असा प्रश्न या याचिकेत उपस्थित केला आहे. पुढील सुनावणी ६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.






