TMC खासदार महुआ मोईत्रा यांनी जर्मनीत गुपचूप उरकलं लग्न; पती 'या' पक्षाचे मोठे नेते
तृणमूल काँग्रेसच्या (TMC) आक्रमक आणि संसद गाजवणाऱ्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गुपचूप विदेशात लग्न केलं आहे. जर्मनीमध्ये त्यांनी एका खासगी समारंभात त्यांनी लग्न केलं असून पती बिजू जनता दलाचे (BJD) माजी खासदार पिनाकी मिश्रा आहेत. ३ मे रोजी हा सोहळा गुगचूप उरकण्यात आला असून पक्ष आणि खासदारांनी मात्र या वृत्तावर मौन बाळगलं आहे.
Shrikant Shinde : “राजकारणात राहुल गांधी खूपच अपरिपक्व…”, श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका
टेलिग्राफच्या वृत्तानुसार, महुआ मोईत्रा आणि पिनाकी मिश्रा यांचं लग्न जर्मनीमध्ये पडलं. एका छायाचित्रात महुआ मोईत्रा पारंपारिक पोशाख आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या जर्मनीमध्ये हसतमुख आणि आनंदी दिसत आहेत. या छायाचित्राने या गुप्त लग्नाची पुष्टी केली आहे. तथापि, आतापर्यंत महुआ किंवा त्यांच्या पक्षाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
महुआ मोइत्रा यांचे वैयक्तिक आयुष्य यापूर्वीही चर्चेत होते. तिने डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सनशी लग्न केले, ज्यांच्याशी तिने नंतर घटस्फोट घेतला. त्यानंतर तिचे वकील जय अनंत देहदराय यांच्याशी तीन वर्षांचे संबंध होते, ज्यांचे वर्णन त्यांनी नंतर “विश्वासघात केलेला प्रियकर” असं केलं होतं.
महुआ मोईत्रा यांचा पहिला लोकसभा कार्यकाळ प्रचंड वादात सापडला. एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र त्यांना निवडणुकीत पुन्हा निवडून आल्या. १२ ऑक्टोबर १९७४ रोजी आसाममध्ये जन्मलेल्या महुआ यांनी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २०१० मध्ये त्या ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये सामील झाल्या. २०१९ मध्ये मोईत्रा पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०२४ मध्ये त्या खासदार म्हणूनही निवडून आल्या. तृणमूल काँग्रेसच्या ज्वलंत आणि प्रभावी भाषणांसाठी लोकप्रिय असलेल्या महुआ बंगालमधील कृष्णनगर येथून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
“कोणाला पाडायचं त्याला…; आगामी पालिका निवडणुकांंमध्ये मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा कोणाला?
महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा हे बीजेडीचे मोठे नेते मानले जातात. त्यांचा जन्म १९५९ मध्ये झाला. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री ब्रज किशोर त्रिपाठी यांचा पराभव केला. पिनाकी हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आहेत. त्यांची जवळजवळ तीन दशकांची राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द आहे. ते अनेक उच्चस्तरीय समित्यांचे सदस्य देखील राहिले आहेत.