ट्विटरमध्ये (Twitter) नेहमी काही ना काही बदल पाहयला मिळतात. कधी ब्लू टिक (Blue Tick ) वरुन तर कधी ट्विटरच्या धोरणावरुन नवे बदल होत असतात. आत पुन्हा इलॅान मस्क ट्विटर वापरकर्त्यांसाठी एक नवीन नियम जाहीर केला आहे. नवीन नियमानुसार, ट्विटर व्हेरीफाईड अकाऊंट युझर्संना आता दिवसाला सहा हजार पोस्ट वाचता येणार आहे. तर अनव्हेरिफाईड अकाऊंट युझर्संना दिवसाला 600 पोस्ट वाचता येणार आहे. तर नव्याने ज्यांनी अकाऊंट उघडलेल्या युझर्संना दिवसाला 300 पोस्ट वाचता येणार आहे.
एलॉन मस्क यांनी शनिवारी ट्विट करत या नव्या नियमाबद्दल घोषणा केली आहे. याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. एलॉन मस्क म्हणाले, डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ट्विटर व्हेरीफाईड अकाऊंट (ब्लू टिक असणारे यूजर) यांना दिवसाला सहा हजार पोस्ट वाचता येणार आहे. तर अनव्हेरिफाईड अकाऊंट ( ब्लू टिक नसणारे यूजर) यांना दिवसाला 600 पोस्ट वाचता येणार आहे. तर नव्याने ज्यांनी अकाऊंट उघडले आहेत अशा अनव्हेरिफाईड अकाऊंटसला दिवसाला 300 पोस्ट वाचता येणार आहे.तसेच एलॉन मस्क यांनी ही लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
मस्कने यापूर्वी ट्विटरचा डेटा अधिकृततेशिवाय वापरल्याबद्दल अनेक कंपन्यांवर टीका केली होती. त्याने मायक्रोसॉफ्टवर त्याच्या एआयला प्रशिक्षण देण्यासाठी ट्विटर डेटाचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचा आरोप केला आणि ओपनएआय तेच करत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.हा अलीकडील बदल अधिक लोकांना Twitter खाती तयार करण्यास प्रोत्साहित करू शकतो, परंतु जर तो कायमस्वरूपी बदल झाला तर त्याचा परिणाम इंटरनेट संग्रहणावर होऊ शकतो, जो आपोआप ट्विट कॅप्चर करतो आणि जतन करतो.मात्र, या बदलामुळे सर्च इंजिनवरील ट्विट्सच्या रँकिंगवर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मस्कने अलीकडेच NBCUniversal मधील जाहिरात विभागाच्या माजी प्रमुख लिंडा याकारिनो यांना ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून नियुक्त केले आहे, तर मस्क स्वतः कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम करत आहे.