नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) हस्ते नवीन संसद भवनाच्या (Parliament) बनवण्यात आलेल्या चिन्हाचे (National Emblem) आज अनावरण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कांस्यपासून बनविण्यात आलेले हे शिल्प ९५०० किलो म्हणजे जवळपास एक टन वजनी आणि ६.५ मीटर उंचीचे हे शिल्प आहे.
Delhi | PM Narendra Modi unveiled the 6.5m long bronze National Emblem cast on the roof of the New Parliament Building today morning. He also interacted with the workers involved in the work of the new Parliament. pic.twitter.com/sQS9s8aC8o
— ANI (@ANI) July 11, 2022
पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यात संसद भवनाचे काम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला. तसेच, सदर शिल्प हे आठ टप्प्यात तयार करण्यात आले असून त्या कम्प्यूटरवर मांडणी करण्यापासून ग्राफिक्स तयार करण्यापर्यंतचा समावेश आहे. यावेळी, लोकसभेचे सभापती ओम बिरलादेखील (Loksabha Speaker Om Birla) उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी हिवाळी अधिवेशन (Winter Session) याच भवनात घेण्याचा मानस असल्याचे सांगितले.