केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे. मुलाखतीला उपस्थित असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. निकालासोबतच टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. UPSC मुलाखत संपल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी निकाल जाहीर झाला आहे.
UPSC CSE प्राथमिक परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल 22 जून रोजी जाहीर झाला. 16 ते 25 सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि 6 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. 18 मे रोजी मुलाखती संपल्या.
एकूण प्रसिद्ध झालेल्या 933 नावांमध्ये पहिला टॉप टेनमध्ये सहा मुली आहेत. तर, राज्यातून ठाण्यातील कश्मिरा संखे प्रथम आली आहे. तर, वसंत दाभोळकरने (76 वा क्रमांक), प्रतिक जराड (122), जान्हवी साठे (127), गौरव कायंदे-पाटील (146) तर ऋषिकेश शिंदे (183) उत्तीर्ण झाले आहेत.
UPSC CSE मध्ये 933 उत्तीर्ण
UPSC ने जाहीर केलेल्या निकालानुसार, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट ‘A’ आणि गट ‘B’ मध्ये नियुक्तीसाठी एकूण 933 उमेदवार यशस्वी घोषित झाले आहेत. 933 यशस्वी उमेदवारांपैकी 345 सामान्य श्रेणीतील, 99 EWS, 263 OBC, 154 SC, 72 ST प्रवर्गातील आहेत.
या परीक्षेद्वारे IAS साठी 180, IFS साठी 38, IPS साठी 200, केंद्रीय सेवा गट ‘A’ साठी 473 आणि गट ‘B’ सेवांसाठी 131 पदे भरण्यात आली आहेत.