वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मधून बाहेर पडून उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
उत्तर प्रदेश : महाराष्ट्रामध्ये एक प्रकल्प जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. उद्धव ठाकरे यांचे सरकार गेल्यानंतर शिंदेंचे सरकार आले. महायुतीचे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली होती. वादग्रस्त ठरलेला हा प्रलक्प तेव्हा शेजारील राज्य गुजरातला मिळाला होता. मात्र आता हा चर्चेत आलेला प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशला गेला आहे.
2022 साली फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे जोरदार राजकारण तापले होते. पुण्यामध्ये हा प्रकल्प होणार होता. पुण्यातील तळेगाव एमआयडीसीमध्ये या प्रकल्पाला जागा देण्यात आली होती. यामुळे लाखो नोकऱ्यांची निर्मिती होणार होती. फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत राज्यामध्ये पूर्ण चर्चा देखील झाली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेला. यामुळे ठाकरे गटाने महायुतीवर जोरदार निशाणा साधला होता. राजकीय दबावामुळे आणि त्यावेळी गुजरात विधानसभा निवडणूक असल्यामुळे हा प्रकल्प गुजरातला वळवल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे केली होती. यानंतर आता प्रकल्प गुजरात राज्याच्या हातून देखील सटकला आहे. यामुळे गुजरातला मोठा दणका मिळाला होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र आणि गुजरातनंतर फॉक्सकॉन प्रकल्प हा उत्तर प्रदेशला मिळाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांतर्गत लाखो लोकांना काम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने फॉक्सकॉनचा सहवा सेमी कंडक्टर प्लॅट बनवण्यासाठी मंजूरी दिली. तीन हजार 700 कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प उत्तर प्रदेश के यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रीयल झोनमध्ये जेवर विमानतळाच्या जवळ उभा राहणार आहे. 2027 पासून या प्रकल्पातून उत्पन्न सुरू होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारत शौर्य तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही ऱॅली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तरुणांचा मोठी लक्षणीय सहभाग होता. त्याचबरोबर वयोवृद्ध लोक देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये हाती तिंरगा घेऊन सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला. यावेळी भारत माता की जय अशा जयघोषाने परिसर दूमदूमुन गेला होता यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, जो कोणी भारताकडे बोट दाखवेल आणि बहिणी-मुलींच्या सन्मानाविरुद्ध काम करेल आणि सुरक्षा तोडेल, त्याच्या अंत्यसंस्कारात रडणारे कोणीही नसेल हे निश्चित आहे.