पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासकीय बैठकीमध्ये बीएसएफ दहशगदवाद्यांना घुसखोरी करत असल्याचा आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
कोलकाता : केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये अनेकदा वादंग होताना दिसतात. सुरक्षेच्या बाबत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मात्र यावेळी त्यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. सीमा सुरक्षा दल असलेल्या BSF वर देखील ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप करत दशहतवाद्यांना घुसखोरी करुन दिली जात असल्याचा गंभीर दावा केला आहे. तसेच हा बंगाल अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
बंगालमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर केला आहे. बंगालमधील या कारवायांसाठी ममता यांनी थेट केंद्र सरकार आणि बीएसएफला जबाबदार धरले आहे. या कामाची ब्लू प्रिंटही केंद्राकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी आज (2 जानेवारी) प्रशासकीय बैठकीत हे सर्व दावे केले. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय बातम्या वाचा एक क्लिकवर
बैठकीत ममता बॅनर्जी यांनी त्यांची बाजू मांडली असून सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, “बीएसएफ बंगालमध्ये वेगवेगळ्या भागातून घुसखोरी करत आहे. बीएसएफ महिलांवरही अत्याचार करत आहे. मी डीजीपींना बीएसएफने कोणत्या ठिकाणाहून लोकांना प्रवेश दिला आहे याची चौकशी करण्यास सांगेन, कारण सीमा आमच्या हातात नाही, जर कोणी आरोप केला की टीएमसी घुसखोरी करत आहे, तर मी म्हणेन की सीमा बीएसएफच्या अंतर्गत आहे आणि बीएसएफ एक आहे. हे सर्व काही कोण करतंय, त्यामुळे आम्हाला दोष देऊ नका आणि घुसखोरीसाठी टीएमसीला दोष देऊ नका,” असे स्पष्ट मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्राकडे सर्व माहिती असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “टीएमसी बीएसएफला संरक्षण देत नाही. मात्र पोलिसांकडे सर्व माहिती आहे. केंद्राकडे सर्व माहिती आहे. राजीव कुमार यांनी मला काही माहिती दिली आहे आणि मला काही स्थानिक माहितीही मिळाली आहे. यासंदर्भात मी पत्र लिहिणार आहे. मला इथे आणि बांगलादेशातही शांतता हवी आहे. आमच्यात कोणतेही वैर नाही. माझ्या राज्यात कोणी दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे मला दिसले तर मी निषेध करेन,” अशा कडक शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत.