Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या व्हॅनवर काळाचा घाला! रेल्वे फाटकावर बसला ट्रेनची धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी जखमी

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात गोबिंदापूर रेल्वे फाटकावर शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला ट्रेनने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू झाला असून अनेक मुले जखमी झाली आहेत. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गेटमनला अटक केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2026 | 03:59 PM
शाळेच्या व्हॅनवर काळाचा घाला! रेल्वे फाटकावर बसला ट्रेनची धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी जखमी

शाळेच्या व्हॅनवर काळाचा घाला! रेल्वे फाटकावर बसला ट्रेनची धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी जखमी

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात
  • ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक
  • दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू
 

West Bengal School Van Accident : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील गोबिंदापूर रेल्वे फाटकावर शुक्रवारी (17 जुलै 2026) सकाळी भीषण अपघात झाला. शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला भरधाव ट्रेनने जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण अपघातात दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांसह एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. तर व्हॅनमधील अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेनंतर प्राथमिक चौकशीअंती रेल्वे फाटकावरील गेटमनला पोलिसांनी अटक केली आहे.

Hindu Succession Act: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! वारसा हक्काची जमीन विकताना बाहेरच्या व्यक्तीआधी भावंडांना द्यावा लागणार

याप्रकरणी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दुःख व्यक्त केले आणि नुकसान भरपाई जाहीर केली. बंगाल सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. भारतीय रेल्वेने प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

मुर्शिदाबादमधील गोविंदपूर रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या अपघातात दोन मुले आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी वाहनात अनेक शाळकरी मुले होती. वाहन रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनने वाहनाला धडक दिली. धडकेचा जोर इतका जास्त होता की मुले गंभीर जखमी झाली. अपघातात एक सायकलस्वारही जखमी झाला.

अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी मदतीसाठी आणि जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी मुलांना बेरहामपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन मुले आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.

अपघात नेमका कसा घडला, रेल्वे फाटक उघडे होते का आणि त्यामागे निष्काळजीपणा होता का, याचा तपास पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, रेल्वे फाटकांवरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन! अवघ्या 5 रुपयांत जींद ते सोनीपत प्रवास, प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षाही स्वस्त भाडे

Web Title: West bengal murshidabad school van train collision three killed children injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Murshidabad
  • School
  • West bengal

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई
1

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.