चांद्रयान 3 च (Chandrayaan) काऊनडाऊन सुरू झालं असून 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनटांनी चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. 14 जुलै रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवना अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 लाँच करण्यात आलं. प्रक्षेपणनंतर चांद्रयान-3 ने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यांनतर, चांद्रयान-३च्या प्रॉपल्शन मॉड्यूलपासून लँडर विक्रम वेगळे झाले आहे. आता लँडर विक्रम चंद्रावर लँड होण्यासाठी एकटेच प्रवास करेल. या मोहीमेत असणारे हे विक्रम लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल म्हणजे काय? आणि लॅंडीग नंतर या दोघांचीही नेमकी काय काम असणार हे जाणून घ्या.
[read_also content=”इस्रोचं चंद्रयान-३ लँडिंग संध्याकाळी का करण्यात येत आहे, चंद्राच्या पृष्ठभागावर अंधारात उतरेल का चंद्रयान-३? https://www.navarashtra.com/india/why-isro-chandrayaan-landing-at-evening-time-all-you-need-to-know-nrps-447912.html”]
चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलने 17 ऑगस्टला प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे केले. आता 23 ऑगस्टला चांद्रयानचं लँडर मॉड्यूल, जे लवकरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, त्यामध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांचा समावेश आहे. लँडरचे नाव विक्रम साराभाई (1919-1971), ज्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि आपल्या देशाच्या अंतराळ संस्था, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे संस्थापक मानले जाते त्यांच्या नावावरून ‘विक्रम’ असे नाव देण्यात आले आहे.. लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हर असतात. या मिशनमध्ये विक्रम लँडरला स्वतः सुमारे 100 किमी अंतर कापायचे आहे.
प्रज्ञान रोव्हर सहा चाकी रोबोटिक वाहन आहे, जे चंद्रावर फिरून त्याची छायाचित्रे गोळा करेल. या रोव्हरवर इस्रोचा लोगो आणि तिरंगा लावण्यात आला आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर चार तासांनी लँडरमधून बाहेर पडेल. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर एक सेंटीमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरेल. यादरम्यान कॅमेऱ्यांच्या मदतीने रोव्हर चंद्रावर असलेल्या गोष्टी स्कॅन करेल. रोव्हर चंद्राच्या हवामानाची माहिती घेईल. त्यात असे पेलोड्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाची चांगली माहिती मिळू शकेल. चंद्राच्या भूपृष्ठाखाली इयॉन्स आणि इलेक्ट्रॉनचं प्रमाण देखील शोधण्याचं काम तो करेल. रोव्हर अशा पद्धतीने बनविण्यात आलाय की तो चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करू शकेल. रोव्हर ही माहिती गोळा करून लँडरला पाठवेल. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी लँडरकडे दोन आठवड्यांचा वेळ असणार आहे. रोव्हर फक्त लँडरशीच संवाद साधू शकतो. त्यामुळे शास्त्रज्ञांपर्यंत ही माहिती केवळ लँडर मार्फतच पोहचू शकते.