Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
CNAP कॉलरचे रजिस्टर्ड नाव स्क्रीनवर दाखवते जे सिम जारी करताना टेलीकॉम KYC रिकॉर्डवर रजिस्टर करण्यात आले होते. ही माहिती इन्कमिंग कॉलिंगवेळी थेट मोबाईल नेटवर्कद्वारे दिली जाणार आहे. एप-बेस्ड कॉलर ID सिस्टमव्यतिरिक्त, CNAP इंटरनेट कनेक्टिविटी, कॉन्टॅक्ट सिंकिंग किंवा यूजर-जेनरेटेड लेबलवर अवलंबून नसते. स्क्रीनवर दाखवण्यात आलेले नाव अधिकृत टेलिकॉम डेटाबेसमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेली आयडेंटिटी दाखवतो. यामुळे योगाची ओळख लपवणे कठीण होते. यामागील उद्देश असा आहे की, जेव्हा कॉलर युजरपर्यंत पोहोचेल तेव्हा आधीच त्याची ओळख व्हेरिफाय केली असेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेलीकॉमटॉक रिपोर्टनुसार, CNAP अद्यापही संपूर्ण देशात पसरलेला नाही. मात्र टेलिकॉम ऑपरेटरने आधीच अनेक क्षेत्रांमध्ये फीचर ऍक्टिव्हेट करण्यास आणि याची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. देशातील आघाडीची टेलिफोन कंपनी जिओ पश्चिम बंगाल, केरल, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व आणि पश्चिम, राजस्थान, पंजाब, असम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्ये CNAP इनेबल्ड असलेले सर्विस ओपन करत आहे.
याशिवाय, भारती एअरटेल पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि जम्मू-कश्मीरमध्ये CNAP ची चाचणी करत आहे. तर Vodafone Idea सध्या महाराष्ट्रमध्ये CNAP सर्विस अधिक मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे आणि तमिळनाडूमध्ये देखील याचे रोल आउट केले जाण्याची शक्यता आहे. BSNL ने पश्चिम बंगालमध्ये ही सर्विस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्स ही सर्व्हिस सर्वत्र रोल आउट करण्यापूर्वी त्याची अचूकता, नेटवर्क कामगिरी आणि वापरकर्ता अनुभव पडताळत आहेत.
फोन-बेस्ड फ्रॉड, इंपर्सनेशन स्कॅम आणि भारतीय मोबाईल नंबरचा दुरुपयोग यांसारख्या चिंता वाढत असतानाचा CNAP ला प्रोत्साहन दिले जात आहे. रेगुलेटर्सचं असं म्हणणं आहे की, अनेक स्कॅम कॉलरची चुकीची माहिती दिल्यामुळे होतात. यामुळे यूजर्सचं नुकसान होतं, पण कॉलरची खरी ओळख समोर येत नाही. सिम कार्ड फेकून दिल्यानंतर देखील WhatsApp सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. या गोष्टीचा स्कॅमर्स फायदा घेतात. CNAP कॉल स्तरावर ओळख संबोधित करते, तर सिम-बाइंडिंग ऑपरेशनल मर्यादा दूर करते. सिम-बाइंडिंग नियमांनुसार, नोंदणी दरम्यान वापरलेले मूळ सिम डिव्हाइसवर सक्रिय राहिल्यासच मेसेजिंग अॅप्स कार्य करतील. जर सिम काढून टाकले किंवा बदलले तर, अॅप पुन्हा व्हेरिफाय करणं आवश्यक असेल. वेब आणि डेस्कटॉप लॉगिन देखील वेळोवेळी तपासले जातील. ज्यामुळे सिमचा गैरवापर करण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.






