(फोटो सौजन्य – istock)
गटागट पाणी पिणे
अनेकजण एकदम पाणी गिळतात किवा बाटली तोडापासून अंतरावर धरून पितात, अशाप्रकारे पाणी चेट घशातून पोटात जाते. पोटातील आम्लीय दवावर अचानक येणार्या जास्त प्रमाणातील पाण्याचा परिणाम होऊन वायु फुगणे किंवा अंतसिडिटी वाढते. त्याउलट पाणी हळूहळू, छोट्या घोटानी प्यायले असता ते सर्वप्रथम जिभेला स्पर्श करते. जिभेवरील क्षारीय लाळ पाण्यात मिसळून पोटातील आम्लीय वातावरणाशी संतुलन साध्यग्रास मदत करते. यामुळे पचन सुधारते आणि अनावश्यक त्रास कमी होतो.
पाण्याचे तापमान दुर्लक्षित करणे
ऋतूनुसार पाणी कसे प्यावे, हे महत्त्वाचे आहे. थंड पाणी उन्हाळ्यात ताजेतवाने वाटते; पण सतत फ्रिजमधील पाणी पिण्याने घसा बसणे, सर्दी, ॲटलर्जी अशा समस्यांचा धोका वाढतो. काही संशोधनांनुसार थंड पाण्याने मायग्रेन खाडू शकतो किंवा नाकातील श्लेष्मा साचण्याचा त्रास वाढतो. काही वैद्यकीय स्थितींमध्ये जसे अँकलेशिया, थंड पाणी वेदना वाढवू शकते. दुसरीकडे, कोमट पाणी पचन सुधारते, कॅलरी बर्न करण्यास मदत करते आणि शरीराला आराम देते.
ओठ फुटणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे, त्वचा कोरडी होणे, केस तुटणे, पिंपल्स, वारंवार लघवी होणे किंवा जळजळ होणे अशा अनेक त्रासांमागे चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचाही मोट वाटा असू शकतो. पाणी किती प्यायचे, हे सर्वांना माहीत असत पण पाणी कसे पिणे चुकीचे ठरू शकते, हे मात्र फार कमी लोकांना समजते. पाणी पिण्याच्या काही सवयी आरोग्यास हानी पोहोचवू शकतात, त्याबाबत जाणून घेऊया.
व्यायामानंतर लगेच पाणी पिणे
व्यायामादरम्यान शरीरातील पाणी कमी होते आणि घसा कोरडा पडतो, पण व्यायामानंतर मोठ्वा घोटानी बंड किया जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. श्वासोच्द्वास वेगाने वालू असल्याने घोट लागण्याची शक्यता वाढते, त्यामुळे व्यायामादरम्यान प्रत्येक १० ते १५ मिनिटानी बोडे थोडे घोट घेणे आणि व्यायामानंतर शरीर शांत झाल्यावर हळूहळू पाणी पिणे अधिक सुरक्षित असते.
जेवणाच्या आधी किंवा नंतर लगेच पाणी पिणे
असे केल्याने पचनक्रियेत अडयाला निर्माण होती. पाण्यामुळे पोटामध्ये पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स पातळ होतात, अन्न एकत्रित होण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे गॅस, फुगणे, जडपणा अशा समस्या उद्भवू शकतात, जेवणाच्या ३० मिनिटे आधी किया ३०0 मिनिटे नंतर पाणी घेणे योग्य मानले जाते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






