मुलीच्या संपत्तीचा वारसदार कोण असतो, तिच्या मालकी हक्काचे काय नियम आहेत, याबाबत अनेकदा संभ्रम असतो. भारतीय कायद्यानुसार (विशेषतः हिंदू वारसा कायदा, 1956 व त्यातील सुधारणा) याबाबत स्पष्ट तरतुदी आहेत.
अनेकदा काही मुली या त्यांच्या आईवडिलांना एकुलत्या एक असतात किंवा घरात भावंडांमध्ये संपत्तीतील काही हिस्सा त्यांच्या मालकीचा असतो. अविवाहित मुलींची प्रॉपर्टी ही घरच्या वारसा हक्काने मिळालेली असते किंवा मग त्या स्वत:च्या मेहनतीवर कमवतात. लग्नाआधीच अचानक या मुलींना काही झालं किंवा त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या प्रॉपर्टीचं काय होणार याबाबात कायद्यात तरदुत केली आहे.
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल, हे ती विवाहित आहे की अविवाहित आणि तिला मुले आहेत की नाहीत, यावर अवलंबून असते.
अविवाहित मुलगी असल्यास आई आणि वडील हे समान हक्काचे वारसदार आई-वडील नसतील – तर भाऊ-बहिणी त्यानंतर – आईकडील किंवा वडिलांकडील नातेवाईक असतात. 2005 च्या सुधारित कायद्यानुसार, मुलगी जन्मतःच वडिलांच्या संपत्तीची समान वारसदार आहे. तिला मुलासारखाच हक्क मिळतो, मग ती विवाहित असो वा अविवाहित. मात्र जर मुलीचे आई वडिल हयात नसतील तर प्रॉपर्टीची वाटणी भावंडामध्ये होते. अविवाहीत मुलगी जर एकुलती एक असेल आणि तिला मिळालेली प्रॉपर्टी ही आईकडून मिळाली की वडीलांकडून यावर ठरतं.
जर प्रॉपर्टी आईकडून मिळाली तर आईच्या नात्यातील म्हणजे मावस बहिण किंवा भाऊ यांना ती प्रॉपर्टी मिळते. तसंच ही प्रॉपर्टी जर वडिलांकडून मिळाली तर वडिलांच्या नात्यातील चुलत बहिण भाऊ यांचा वारसा हक्क असतो असं कायद्यात सांगितलं जातं. हिंदू वारसा कायदा, 1956 या नुसार आधारित आहे. प्रत्येक धर्मानुसार याचे कायदे वेगळे देखील असू शकतात. त्यामुळे लग्न झालं असो किंवा नसो मृत्यूपत्र प्रत्येकाने करणं हे भविष्याच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरतं.
Ans: मुलीने कमावलेली संपत्ती, वारशाने मिळालेली मालमत्ता, भेटवस्तू (Gift), स्त्रीधन किंवा पतीकडून मिळालेली संपत्ती – या सर्वांवर मुलीचा पूर्ण आणि स्वतंत्र मालकी हक्क असतो.
Ans: लग्न झाल्यानंतरही मुलीचा तिच्या संपत्तीवरील हक्क कायम राहतो. पती किंवा सासरची मंडळी तिच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाहीत.
Ans: आई आणि वडील समान हक्काचे वारसदार असतात. आई-वडील नसतील तर भाऊ-बहिणी वारसदार ठरतात.






