कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
संपूर्ण जगभर पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, थायलंडसह भारतात देखील कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट्समुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या ही परिस्थिती गंभीर नसली, तरीही दक्षता घेणे अत्यंत असल्याचं म्हटलं आहे.तसंच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
हाताचे तापमान उलगडत असते तुमच्या आतड्यांच्या आरोग्याचे रहस्य; जाणून घ्या काय सांगत आहे गट हेल्थ
WHO च्या अहवालानुसार, सध्या कोरोना विषाणूचे NB.1.8.1, JN.1, आणि KP.2 हे नवीन व्हेरिएंट्स आढळून आले आहेत. हे सर्व ओमिक्रॉनचे उपप्रकार (sub-variants) आहेत. त्यातील NB.1.8.1 चीन, अमेरिका आणि काही युरोपियन देशांमध्ये वेगाने पसरत आहे. भारतात देखील NB.1.8.1 आणि LF.7 या उपप्रकारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
WHO ने आता NB.1.8.1 ला “Variant of Monitoring” या श्रेणीत टाकले आहे. याअगोदर तो “Variant of Interest” होता. या बदलाचा अर्थ असा की, या व्हेरिएंटवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
परिस्थिती नियंत्रणात – पण धोका कायम
WHO च्या मते, या व्हेरिएंटमुळे सध्या गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे आणि बहुतेक लोकांना सौम्य लक्षणे आहेत. मात्र, विषाणू कधी रूप बदलून गंभीर परिस्थिती निर्माण करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
भारतातील स्थिती
महामारी तज्ञ डॉ. जुगल किशोर यांच्या माहितीनुसार, भारतात मागील काही आठवड्यांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्र, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये नवीन रुग्ण समोर आले आहेत. बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे – हलकी खोकली, ताप, घशात खवखव – जाणवत आहेत. गंभीर रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. भारतामध्ये नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार झालेली आहे आणि बहुतांश लोकांनी लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आहे.
प्रत्येक देशाने आपली टेस्टिंग, रिपोर्टिंग, आणि जीनोम सिक्वेन्सिंग प्रणाली अधिक मजबूत करावी.
लोकांनी स्वतःही काळजी घ्यावी.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावं, आवश्यक असल्यास मास्कचा वापर करा.
हातांची स्वच्छता राखा. बाहेरून आल्यावर किंवा वेळोवेळी हात धुवा.
लक्षणे दिसल्यास त्वरित चाचणी करून घ्या आणि गरज असल्यास स्वतःला इतरांपासून वेगळं राहा.
कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी बूस्टर डोस घेण्याचा विचार करावा.
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे विशेष काळजी घ्या.
आधीपासूनच साखर, रक्तदाब, दमा यांसारख्या आजारांनी त्रस्त लोकांनी अधिक सतर्क राहावे.
सध्या कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी सावध राहणे गरजेचे आहे. सरकार आणि WHO च्या मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं पाहिजे.