फोटो सौजन्य - Social Media
‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर हिला नुकताच एक अतिशय गंभीर आधार जडल्याची माहिती समोर आली आहे. दीपिकाने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे. दीपिका आधी पोटाच्या वरच्या भागात वेदना होत होत्या आणि यकृताचा ट्यूमर हे त्याचे कारण असल्याचे सांगण्यात आले होते. पण डॉक्टरांच्या चाचणीतून आता असे दिसून आले की या लक्षणामागील कारण स्टेज २ यकृताचा कर्करोग होता.
यकृताच्या कर्करोगाच्या दुसऱ्या टप्प्याची लक्षणे जाणून घेऊया. हा अवयव शरीरात ग्लायकोजेन आणि अनेक जीवनसत्त्वे साठवतो. हे विषारी पदार्थ काढून टाकण्याचे आणि अन्न पचवण्यासाठी पित्त तयार करण्याचे काम करते. उजव्या बाजूला बरगडीच्या खाली गाठ वाटणे, या बाजूला वेदना होणे, पोटात सूज येणे, कावीळ होणे, नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, गडद रंगाचा लघवी होणे ही यकृताच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. मद्यपान हे यकृताचा सर्वात मोठा शत्रू मानले जाते. यामुळे आपले अवयव खराब होतात आणि परिणामी कर्करोगाचा धोका वाढतो. मात्र हे एकाच कारण कर्करोगासाठी कारणीभूत ठरत नाही तर यामागे अनेक कारणे असू शकतात ज्याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
स्वयंपाक करण्याच्या या ३ पद्धतींपासून सावध
या स्वयंपाकामुळे कर्करोग कसा होतो?
ग्रिलिंग, बार्बेक्यूइंग आणि पॅन फ्रायिंग करून अन्न शिजवल्याने धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः मांस शिजवताना खूप काळजी घेतली पाहिजे. कारण या स्वयंपाकात अन्न जास्त शिजण्याचा धोका असतो. २०२० च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, मांस जास्त शिजवल्याने PAHs आणि HCAs नावाचे कर्करोग निर्माण करणारे संयुगे तयार होतात.
विषारी घाण रक्तात भरेल
हे कर्करोग निर्माण करणारे रसायने पेशींच्या डीएनएला नुकसान पोहोचवतात. याशिवाय रक्तातील विषारी पदार्थांचे प्रमाण यामुळे वाढते. हे विषारी घटक रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरतात आणि कोणत्याही अवयवात कर्करोग निर्माण करण्याचे काम करू शकतात.
स्टार्चयुक्त पदार्थांपासूनही धोका
बटाट्यांसह अनेक पदार्थांमध्ये स्टार्च असते. जेव्हा आपण त्यांना हाय फ्लेमवर शिजवतो किंवा तळतो तेव्हा अॅक्रिलामाइड तयार होते. हे कर्करोगजन्य मानले जाते आणि शरीरासाठी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. म्हणून, पिष्टमय पदार्थ जास्त शिजवणे टाळा.
खाण्याची योग्य पद्धत
हाय फ्लेमवर स्वयंपाक केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून, अशा स्वयंपाक पद्धती वापरा ज्यांना जास्त तापमानाची आवश्यकता नसते. यासाठी तुम्ही प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक करणे, कमी तापमानावर बेकिंग करणे किंवा भाजणे या पद्धतींचा अवलंब करू शकता.