बहादूरगड : हरियाणातील बहादूरगडमध्ये सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका तरुण आणि तरूणीचा संशयास्पद मृत्यू झाला. दोघेही यूट्युबर होते आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. गर्वित (25) आणि नंदिनी (22) अशी मृतांची नावे आहेत. काही वेळापूर्वी हे दोघेही देहराडूनहून आपल्या टीमसोबत बहादूरगडला आले होते. दोघेही व्हिडिओ बनवून फेसबुक आणि यूट्यूबवर पोस्ट करायचे.
सध्या तो बहादूरगड शहरातील रुहिल रेसिडेन्सी सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 701 मध्ये राहत होता. गर्वित हे शनिवारी सकाळीच येथे आले होते.