हैदराबाद : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. यामधील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही गंभीर असतात. त्याचबरोबर अनेक फूड डिलिव्हरी करणाऱ्यांचेही व्हिडिओ नेहमी पाहायला मिळतात. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॅाय दुचाकी सोडून चक्क घोड्यावरुन (Food Delivery On Horse)जेवणाची ऑर्डर पोहचवण्याचं काम करताना दिसत आहे. हा तरुण अक्षरश: गजबजलेल्या भागातून घोड्यावर बसून जाताना दिसल्यावर सगळेच चक्रावून गेले आहेत.
[read_also content=”आमिर खानची लेक इरा आज अडकणार विवाहबंधनात, नुपुर शिखरेसोबत बांधणार लग्नगाठ! https://www.navarashtra.com/movies/aamir-khan-daughter-ira-khan-nupur-shikhare-wedding-at-mumbai-tajland-hotel-nrps-494576.html”]
नुकतेच केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणात नवीन तरतुदी लागू केल्या आहेत, ज्या अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. या कायद्याच्या विरोधात मंगळवारी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला होता याचा फटका सामान्य लोकांना बसला. पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे फूड डिलिव्हरी बॅायने दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्याची वाट न पाहता सरळ घोड्यावर स्वार होऊन जेवण पोहोचवलं. झोमॅटो बॉयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हैदराबादच्या चंचलगुडा परिसरातील हा एका झोमॅटो बॅायचा आहे. यामध्ये तो दुचाकीवरून नव्हे तर घोड्यावर बसून फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. हा तरुण गजबजलेल्या भागातून घोड्यावर स्वार होऊन त्याला जाताना बघुन सगळेच चक्रावून गेले. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला कारण विचारले असता पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग असल्याने त्याला दुचाकीवर पेट्रोल भरण्यास वेळ लागला. त्यामुळे वेळत फूड डिलिव्हरी करायची असल्यामुळे त्याला घोड्यावरून जाणे अधिक सोईचं वाटलं. असं तो म्हणाला. हा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांनी या डिलिव्हरी बॉयचं कौतुक केलं आहे. काहींनी त्याच्या कर्तवनिष्ठतेचं कौतुक केलं तर अनेकांनी त्याच्या टाईम मॅनेजमेंटच कौतुक केलं.