संग्रहित फोटो
यावेळी रिपब्लीकन पार्टिचे अध्यक्ष सचिन खरात, बाटीर्चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांसह आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी आलेलो असून, याठिकाणी येणाऱ्या अनुयायांना जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या वतीने चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूकीचे दिवस असुनही राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे,
महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागणार आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढण्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार आहे. ज्यांच्यासोबत युती झालेली आहे त्यांना काही जागा सोडण्यात आल्या असून स्थानिक ठिकाणी आघाड्याही होणार असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले.
परिसराच्या विकासाबाबात चर्चा
आरपीआय खरात गटाचे सचिन खरात म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कोरेगाव भीमा परिसराच्या विकासाबाबात चर्चा झाली. बाकीच्या विषयावर चर्चा झाल्यानंतर माध्यमाशी बोलेल असे सांगत गुंडांच्या उमेदवारीवर बोलणे त्यांनी टाळले.






