बंगळुरू : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबचा वापर करण्यावरून गेले अनेक दिवस देशात गदारोळ सुरू होता. दरम्यान मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबचा वापर करणे इस्लामचा अनिवार्य भाग नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळा-कॉलेजने ठरवलेला गणवेश परिधान करण्यास नकार देऊ शकत नाहीत. कोर्टाने हिजाबशी संबंधित याचिका फेटाळल्या आहेत मात्र हा वाद अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कर्नाटक मधील उप्पिनंगडी येथील 231 मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिजाबशिवाय परीक्षेला बसण्यास नकार दिल्याचे ताजे प्रकरण समोर आले आहे(231 students wearing hijab denied admission; Opposed to the exam).
येथील शासकीय पीयू महाविद्यालयात तब्बल 231 मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिजाबशिवाय परीक्षेला बसण्यास नकार दिला आहे. या सर्व विद्यार्थींनींना महाविद्यालयात प्रवेश नाकरण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनीनी निदर्शने केली आहेत. यावर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कर्नाटकातील उप्पिनगडी येथील सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी कॉलेज प्रशासनाला कळवले होते की, ते हिजाबशिवाय परीक्षेला बसू शकत नाहीत. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षेला बसू दिले नाही. यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या आवारात निदर्शने सुरू केली.
दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या विद्यार्थीनींनी सुप्रिया कर्टोत धाव घेतली आहे. या याचिकेवर सुप्रिम कोर्ट होळीनंतर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]