खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा ॲनिमिया होतो. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे या समस्येला सामोरे जावे लागते. या धावपळीच्या जीवनात लोकांना घरी बनवलेले अन्न खाण्याची सवयच राहिलेली नाही आणि जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा फास्ट फूड खाऊन पोट भरले जाते. त्यामुळे शरीरात योग्य पोषक तत्वे नसल्यामुळे हळूहळू रक्ताची कमतरता निर्माण होते. ज्यामध्ये अशक्तपणा, छातीत दुखणे, वेगवान हृदयाचे ठोके इत्यादी अनेक आजार होतात. सध्या अनेक जणांना या समस्यांनी ग्रासले असून त्यासाठी या लेखात दिलेल्या पाच फळांचे नियमित सेवन करावे.
फळांचा समावेश केल्यास तुमच्या शरीरातील रक्तातील कमतरता भरून काढण्यास वेळ मिळतो आणि तुम्हाला निरोगी राहण्यास मदत मिळते. (फोटो सौजन्य - iStock)

डाळिंबात विटामिन सी, विटामिन ए आणि लोह यांसारखे पोषक घटक आढळतात. यासोबतच डाळिंब शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यात खूप मदत करते. दररोज सकाळी एक डाळिंब खाल्ल्यास ३० दिवसात योग्य परिणाम दिसतो. (फोटो सौजन्य - iStock)

12 महिने बाजारात सहज उपलब्ध असलेले सफरचंद हे फळ शरीरातील रक्त वाढवण्यासाठी खूप चांगले ठरतेृ. रोज सकाळी नाश्त्यापूर्वी सफरचंद त्याच्या सालीसह खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य - iStock)

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर मानले जाते. शरीरात रक्त निर्माण करण्यासोबतच द्राक्षे शरीरातील कमजोरीही दूर करतात.(फोटो सौजन्य - iStock)

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण केळं वाढवते. केळ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.(फोटो सौजन्य - iStock)

संत्र्यामुळे विटामिन सी मिळते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते. तसेच ते खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते.(फोटो सौजन्य - iStock)






