सहल ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांनाच फार आवडते. आपल्या कामाच्या गडबडीतून लोक बाहेर येऊन सहलीला आयुष्याची खरी मजा अनुभवतात. यातही जर कधी परदेशात जाण्याची संधी मिळाली तर मग मज्जाच मज्जा. मात्र वाढत्या गुन्ह्यांचे प्रकार बघता कुठेही फिरायला जाणे हे तितके सेफ राहिलेले नाही त्यामुळे कुठेही जायचे असल्यास त्या ठिकाणावषयी आणि त्या ठिकाणच्या सुरक्षिततेविषयी सविस्तर माहिती मिळवणे फार गरजेचे असते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून
तुमच्यासाठी योग्य नसलेल्या कोणत्याही ठिकाणी जाणे टाळावे. आता यांनतर प्रश्न असा पडतो की, मग कुठे जाणे सुरक्षित आहे आणि नक्की कुठे फिरायला जावे? यासाठी इंटरनेटचा वापर करून तुम्ही कोणत्याही ठिकाणांची माहिती मिळवू शकता. परंतु फोर्ब्सच्या सल्लागाराच्या ताज्या अहवालातून तुम्हाला जगातील काही सुरक्षित शहरांची माहिती मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुरक्षित शहरांची नावे सांगत आहोत.
जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत सर्वात पहिला क्रमांक सिंगापूरचा येतो. येथील सुंदर आणि अद्भुत इंफ्रास्ट्रक्चर आणि नगण्य गुन्हेगारी दरामुळे हे शहर जगातील सर्वात सुरक्षित शहर मानले जाते.
या यादीत जपानची राजधानी टोक्यो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जागीही तुम्हाला गुन्हेगारीचे प्रमाण फार कमी आहे आणि इंफ्रास्ट्रक्चरदेखील फार चांगले आहे. त्यामुळे या ठिकाणाला भेट देणे फार संस्मरणीय ठरू शकते.
कनाडातील टोरंटोमध्ये कमाल इंफ्रास्ट्रक्चरसोबत पर्सनल आणि हेल्थ सेफ्टीदेखील खूप छान आहे. त्यामुळेच हे शहर जगभरातील सुरक्षित शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सिडनीचे इंफ्रास्ट्रक्चर जगभरातील सर्वोत्तम इंफ्रास्ट्रक्चर असलेल्या शहरांपैकी एक आहे. याशिवाय पर्सनल सुरक्षेबाबतही येथे विशेष काळजी घेतली जाते. हे ठिकाण या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
स्विट्जरलैंडमधील ज्यूरिख येथे क्राईम रेट फार कमी आहे. तसेच इथे सुरक्षा फार काटेकोरपणे पाळली जाते. याचे इंफ्रास्ट्रक्चरदेखील फार मजबूत आहे. त्यामुळेच हे ठिकाण या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.