बॉलिवूचे मेगास्टार म्हटल्या जाणाऱ्या अमिताभ यांना तुम्ही अनेक उत्तमोत्तम हिट चित्रपटांमध्ये पाहिले असेल. त्यांनी 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आपल्या 56 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या हिट चित्रपटांच्या यादीत 'शोले', 'दीवार', 'अमर अकबर अँथनी', 'कभी कभी', 'मोहब्बतें' आणि 'पिंक' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. पण आज आम्ही तुम्हाला बिग बी यांच्या अशा काही 5 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे कधीही बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले नाहीत.
Amitabh Bachchan Unreleased Movies: बिग बी यांचे ते 5 चित्रपट, जे कधीही प्रदर्शित झाले नाहीत
या यादीत सर्वात प्रथमस्थानी आहे 'अपना पराया'. या चित्रपटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात ते रेखासोबत दिसणार होते. अमिताभ बच्चन आणि रेखा ही जोडी बॉलीवूडची नंबर 1 जोडी असल्याचे म्हटले जाते, ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, त्यापैकी बहुतेक हिट ठरले आहेत, परंतु त्यांचा हा चित्रपट कधीही प्रदर्शित हौस शकला नाही.
अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांनी ‘सिलसिला’ (1981) या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटानंतर ते दोघे इतर कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नसले तरी तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रपटाव्यतिरिक्त हे तिघेही 'एक था चंदर एक थी सुधा'मध्ये दिसणार होते. मात्र, हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही
अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक सुजित सरकार 'शूबाइट' चित्रपटात एकत्र काम करत होते. हा एक इमोशनल ड्रामा चित्रपट होता. मात्र, हा चित्रपटही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला नाही. काही कायदेशीर अडचणींमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले आणि हा प्रकल्प अपूर्णच राहिला. वृत्तानुसार, निर्मितीशी संबंधित कायदेशीर अडथळ्यांमुळे चित्रपट स्थगित करावा लागला
अमिताभ बच्चन यांच्या 'सरफरोश' या चित्रपटात त्याच्यासोबत परवीन बाबी, कादर खान आणि शक्ती कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होते. हा एक मोठा चित्रपट होऊ शकला असता, पण काही कारणांमुळे तो मध्यंतरी थांबला. हा चित्रपट का बंद करण्यात आला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण माध्यमांमध्ये देण्यात आलेले नाही
अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटात माधुरी दीक्षित दिसून येणार होती. विशेष म्हणजे या दोघांचा एकत्र हा पहिलाच चित्रपट होत. दोघांनीही या चित्रपटाचे काही भाग शूट केले होते, परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि मध्येच थांबवण्यात आला. चित्रपटाचे नाव 'संकट' होते, पण काही कारणास्तव तो पुढे जाऊ शकला नाही