देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, गेल्या 24 तासात राज्यात ८०३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच, काल तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबई, ठाणे व जालन्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या ८१ लाख ४७ हजार ६७३ वर गेली आहे तर आतापर्यंत एक लाख ४८ हजार ४५४ जणांना कोरोनामुळे मृत्य झाला आहे.
[read_also content=”मढ-मालाडमधील अनधिकृत स्टुडिओतील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात, किरीट सोमय्यांच्या उपस्थितीत कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/demolition-of-madh-malad-illegal-film-studios-has-start-from-todays-morning-in-presence-of-kirit-somaiya-nrps-381761.html”]
राज्य सरकारच्या आरोग्य विभागानुसार, सध्या राज्यात कोरोना रुग्णांच बरं होण्याचे प्रमाण 98.13 टक्के आहे. तर, राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के आहे. सध्या राज्यातील रुग्णालयात तीन हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत गुरुवारी कोरोनाच्या 216 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, एका रुग्णाच्या मृत्यू झाला. या रुग्णसंख्येसह मुंबईतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1268 वर पोहोचली आहे.
मुंबईमध्ये सलग दोन दिवस करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने महापालिकेसमोर आता आव्हान निर्माण झाले आहे. राज्यात करोनारुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. गुरुवारी ६८७ तर आजपर्यंत एकूण ७९ लाख ९५ हजार २३२ करोनाबाधित बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या आठ कोटी ६६ लाख ७५ हजार ७७२पैकी ८१ लाख ४७ हजार ६७३ (०९.४० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलले आहेत.