दीपक केसरकर यांनी सांगितले उद्धव ठाकरेंपासून दूर जाण्याचे कारण; म्हणाले…
Marathi Breaking News Updates : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. यापूर्वी शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट हे तयार झाले. यावरच आता शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे अनुयायी असलेली शिवसेना कधीही काँग्रेसच्या विचारांशी सहमत होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.
महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. त्यात दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे अनुयायी असलेली शिवसेना कधीही काँग्रेसच्या विचारांशी सहमत होऊ शकत नाही. काँग्रेस सोडल्यानंतर महायुती सरकार स्थापन झाले. भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्व विचारसरणी सामायिक आहे आणि म्हणूनच महायुती युती मजबूत आहे. तसेच काँग्रेस नेहमीच वीर सावरकरांच्या विरोधात आहे. परिणामी, काँग्रेसला पाठिंबा देणारी शिवसेना (यूबीटी) गेल्या निवडणुकीत जनतेने पराभूत केली.
08 Jan 2026 07:04 PM (IST)
पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापले आहे. ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण ईडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली आहे. नेमके काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात. आज ईडीने पश्चिम बंगालमध्ये I-PAC च्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी त्या ठिकाणी जाऊन तपास यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
08 Jan 2026 06:47 PM (IST)
भूत आहे की नाही? यावर कुणीही ठोस असे म्हणू शकत नाही. काही म्हणतात भूत नाही कारण त्यांनी अनुभवले नाही. ज्यांना अनुभव आहे ते या गोष्टी सिद्ध करू शकत नाहीत कारण ज्याच्या नशीबात आहे त्यालाच त्या गोष्टींचा अनुभव होतो, त्या गोष्टीला आपण आपल्या इच्छने प्रत्येकाला दाखवून देऊ शकत नाही. त्यामुळे त्या गोष्टी सिद्धही करता येत नाहीत आणि पुन्हा तोच प्रश्न उपस्थित राहतो की ते खरे आहेत की निव्वळ अंधश्रद्धा!
08 Jan 2026 06:37 PM (IST)
रायगड (उरण) : राज्यात सगळीकडे २९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने मात्र कर्तव्यभावनेचा विसर पडू दिलेला नाही. भारतीय सैन्यदलाने केलेली मागणी पूर्ण करत त्यांना शिवसेनेच्या वतीने ५० कंटेनर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यातील ४६ कंटेनर यापूर्वीच सीमेवर रवाना करण्यात आले असून, उर्वरित चार कंटेंनर आज उरणमधून सैन्याच्या हवाली करण्यात आले. युवासनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हे कंटेनर भारतीय सैन्यदलातील अधिकारी सुभेदार सयाजी निगडे आणि नायक सुभेदार आनंद गायकवाड यांच्या हवाली करण्यात आले.
08 Jan 2026 06:16 PM (IST)
पंढरपूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा नदी प्रदषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रातील द्षित पाण्यामुळे जलचर प्राण्यांबरोबरच पशू-पक्ष्ांचा जीवही धोक्यात आला आहे.
08 Jan 2026 06:06 PM (IST)
नांदेड : नांदेड मनपा प्रचाराची रणधुमाळी सुरू असून वीस प्रभागात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून रॅली, कॉर्नर बैठका आयोजित केल्या जात आहे, यासाठी माणसे जमवितांना उमेदवारांची पुरती दमछाक होत असून उमेदवारांना सभा, रॅलीचे मॅनेजमेंट करणाऱ्या ठेकेदारांमुळे मात्र दिलासा मिळाला आहे, ‘दामोजी’ मोजला की, काम फिनीश सभा, रॅली सुरू होण्याआधी महिला, पुरूषांचे जत्थेच्या जत्थे कार्यक्रमस्थळ हजर झाल्याचे चित्र पहावयास मिळत असून प्रचारामुळे महिलांना रोजगार मिळाला आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ हाताला काम मिळत असल्यामुळे लाडक्या बहिण व भावांना तात्पुरते का होईना, अच्छे दिन आले आहेत.
08 Jan 2026 05:57 PM (IST)
गेले काही दिवस चर्चेत राहिलेला Poco चा स्वस्त स्मार्टफोन अखेरीस लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला असून या वेळी किंमत १५,००० रुपयांपेक्षा जास्त असली तरी यात अनेक आकर्षक फीचर्स आहेत. पोको एम८ स्मार्टफोनमध्ये ६.७७ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. तो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३२०० निट्सचा पीक ब्राइटनेस देतो. हा फोन ७.३५ मिमी स्लीक आहे. पोकोने या फोनला स्नॅपड्रॅगन ६ जेन ३ चिपसेट दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आहे. यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा आहे.
08 Jan 2026 05:49 PM (IST)
शातील आघाडीचे उद्योगपती आणि बिहारमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांना नवीन वर्षात मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेत निधन झाले आहे. ४९ वर्षीय अग्निवेश स्कीइंग अपघातात जखमी झाले होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेदरम्यान त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या तरुण मुलाच्या निधनाने अग्रवाल कुटुंबाला धक्का बसला आहे.
08 Jan 2026 05:36 PM (IST)
KTM ने RC 160 ही त्यांची नवीन बाईक लाँच केली आहे. KTM RC 160 मध्ये 164.2 cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमधून बाईकला 19 PS पॉवर आणि 15.5 Nm टॉर्क मिळतो. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या इंजिनच्या मदतीने ही बाईक कमाल 118 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. KTM कडून या नवीन बाईकला 1.85 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आले आहे.
08 Jan 2026 05:04 PM (IST)
सोशल मीडियावर रोज काही वा काही वेगळं व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्रविचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहयाल मिळतात. सध्या एक आश्चर्यकार व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक रोबोट निवडणुकाच प्रचार करताना दिसत आहे. नुकतेच महाराष्ट्रात महानगरपालिकाच्या निवडणुका आहे. याचा प्रचार सध्या सुरु असून सर्व पक्ष जोरदार प्रचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळालेले नाही. परंतु कमेंट सेक्शनमध्ये हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच व्हिडिओला वाढीव आमचं पुणे गाणही लावण्यात आले आहे.
08 Jan 2026 05:00 PM (IST)
राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांचा विरोध डावलून राज्य सरकारने ताडोबातील खाण ताडोबाचे एकूण क्षेत्रफळ प्रकल्पाला परवानगी दिल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा प्रकल्प झाला तर तेथील ७५ वाघांचे काय होणार, असा प्रश्न या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात तज्ज्ञांनी आधीच इशारा देत सदर प्रकल्पाला परवानगी न देण्याची भूमिका सरकारला कळवली होती. मात्र त्यानंतरही ही परवानगी देण्यात आली आहे.
08 Jan 2026 04:55 PM (IST)
गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरु झालेली मालिकेचा लवकरच अंतिम भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काजळमाया मालिकेचा अंतिम भागाचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मराठी मालिका किंवा सिनेमात देखील भयपट, रहस्यमय कथा यांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय मात्र काजळमाया मालिकेला TRP च्या रेषेत म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
08 Jan 2026 04:50 PM (IST)
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. रॅली, प्रचार सभा तसेच नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. अशातच प्रभाग क्रमांक ५ मधून शिवसेना–भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रमिला भगवान पाटील आणि किरण भांगले यांचा प्रचार जोमात सुरू असून त्यांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवि पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार डोअर टू डोअर प्रचार करताना दिसत आहेत. प्रचारादरम्यान महिलांसाठी स्वतंत्र प्रशासकीय रुग्णालय उभारणे, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच युवकांसाठी आयटी हब उभारणी यावर उमेदवारांनी विशेष भर दिला. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत विकासाचे आश्वासन देण्यात आले. आज मिलिंद नगर आणि पोलीस लाईन परिसरात प्रचार पूर्ण करण्यात आला असून येत्या शुक्रवारी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
08 Jan 2026 04:45 PM (IST)
राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीआधीच तब्बल 70 हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या प्रकारामुळे आता जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि आक्रोश पाहायला मिळत आहे. एकीकडे मतदान हा लोकशाहीतील सर्वसामान्य जनतेचा मूलभूत अधिकार मानला जातो, तर दुसरीकडे मात्र उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने जनतेच्या मतालाच किंमत उरलेली नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. जर उमेदवार आधीच ठरवले जात असतील, तर मग आम्ही मतदान करायचं तरी कशासाठी? असा थेट सवाल ठाणेकरांनी केला आहे.
08 Jan 2026 04:40 PM (IST)
अंबरनाथ मधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी आज भाजप मध्ये प्रवेश केलाय.. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश झाला.. आम्हाला कोणतीही सुचना न देता थेट आमच्यावर कांग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने आम्ही नाराज होऊन भाजपत प्रवेश केल असल्याचं सांगण्यात आलं आहे.
08 Jan 2026 04:36 PM (IST)
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जोरदार आंदोलन छेडण्यात आले. “टाळे ठोका… टाळे ठोका… लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला टाळे ठोका” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.या आंदोलनाला लोटे येथील स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. कंपनीमुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय हानीचा निषेध करत आंदोलकांनी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.
08 Jan 2026 04:00 PM (IST)
दारू पिणे हे सर्वांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, परंतु त्याचे परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त असू शकतात. या दाव्यामागे ठोस वैज्ञानिक कारणे आहेत, जी स्पष्ट करतात की दारूचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर लवकर का होतो. जर तुम्हालाही या रंजक प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर चला त्यामागील कारणे शोधूया. नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार ही माहिती आम्ही आमच्या वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहोत. आता खरं तर महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतात. इतकंच नाही तर सिगारेट ओढण्याच्या आणि दारू पिण्याच्या बाबतीतही पुरुषांइतक्या अनेक महिला अग्रेसर झाल्याचे दिसून येत आहे. पण वैज्ञानिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा महिलांना दारू अधिक लवकर नशा आणत असल्याचे दिसून आले आहे. कसे ते पाहूया.
08 Jan 2026 03:50 PM (IST)
Nationalist Congress Party campaign Office Fire: निवडणुकीच्या धामधुमीत आरोप-प्रत्यारोपांची भाषा अधिक धारदार होत चालली आहे. सोलापूरमध्ये खुनाची घटना घडल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रकार समोर आल्याने निवडणूक काळातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कैलासनगर परिसरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
08 Jan 2026 03:30 PM (IST)
Maharashtra Politics News Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात एक विचित्र खेळ पाहायला मिळाला. काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसने युती केली, तर काही ठिकाणी ओबीसींनी भाजपशी हातमिळवणी केली. हे प्रकरण हायकमांडपर्यंत पोहोचताच चित्र स्पष्ट झाले. बुधवारी (7 जानेवारी ) महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही घडले जे क्वचितच कोणी अपेक्षित केले असेल. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने युती केली. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, नंतर युती तुटली. हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर काँग्रेसनेही कारवाई केली. त्यानंतर भाजपने एक नवीन खेळ खेळला.
08 Jan 2026 03:20 PM (IST)
सावंतवाडी: दाणोली-बावळाट ते बांदा या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून ते ३ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मागांची व्यवस्था करण्यात आली आहे. अवजड वाहने आता बेळगाव-वेंगुर्ला राष्ट्रीय महामार्गावरून सावंतवाडी मार्गे जातील, तर हलकी वाहने सातुळी पूल, ओटवणे आणि माजगाव मार्गे सावंतवाडीला जाऊ शकतील. दाणोली ते बांदा वा १६ किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
08 Jan 2026 03:10 PM (IST)
Shreyanka Patil has recovered from her injury : अष्टपैलू श्रेयंका पाटीलला असे वाटते की ती पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे, दुखापतींमुळे एका वर्षापेक्षा जास्त काळ बाजूला राहिली होती. दुखापतींच्या मालिकेने २३ वर्षीय क्रिकेटपटूला तिच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मौल्यवान जीवनाचे धडे दिले. २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर श्रेयंकाच्या शिन स्प्लिंट्सचा त्रास झाला, त्यानंतर मनगटाची दुखापत झाली आणि गेल्या वर्षी मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी राष्ट्रीय संघात परतण्याचा तिला विश्वास होता तेव्हाच तिला अंगठ्याला दुखापत झाली. मैदानावर परत येऊ न शकल्याने ती निराश झाली आणि तिच्या पुनर्प्राप्ती प्रक्रियेदरम्यान तिने स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतले.
08 Jan 2026 03:01 PM (IST)
भारतीय रेल्वेमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी भरतीची संधी आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना २१ जानेवारीपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे तर २० फेब्रुवारीपर्यंत भरती जाहीर करण्यात आली आहे. २२ हजारांहून अधिक पदे या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. . चांगली पगारश्रेणी, नोकरीची हमी आणि केंद्र सरकारच्या विविध सुविधा पाहत आहात तर नक्कीच ही भरती दहावी पास उमेदवारांसाठी श्रेष्ठ आहे. याला भरतीच्या माध्यमातून विविध पदे जसे की रे ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समॅन, हेल्पर यांसारख्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवारांना थेट अर्ज करता येणार आहे.
08 Jan 2026 02:55 PM (IST)
नवी दिल्ली: आज सकाळी देशातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी जिल्हा न्यायालयांना देण्यात आली आहे. यामुळे धमकी प्राप्त झालेल्या जिल्हा न्यायालयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
08 Jan 2026 02:50 PM (IST)
Sanjay Raut News : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगल्या आहेत. 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जोरदार प्रचाराचा धुराळा उडाला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र मुलाखत पार पडली आहे. खासदार राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली जात आहे.
08 Jan 2026 02:46 PM (IST)
पिढ्यानपिढ्या, इंडोनेशियन रविवारची सकाळ "डोरेमॉन" पाहत सुरु करत असत, एक निळी रोबोट कॅट जी मुलांना मैत्रीचे धडे देत असे आणि त्यांच्या विचित्र गॅझेट्सने त्यांचे मनोरंजन करत असे. आता, वर्षानुवषे चालणारे कार्टून अचानक बंद होणार असल्याचे समोर आले आहे. तीन दशकांहून अधिक काळ प्रसारित झाल्यानंतर, लोकप्रिय जपानी ॲनिमे शो "डोरेमॉन" इंडोनेशियन टेलिव्हिजन चॅनेल राजावली सिट्रा टेलिव्हिसी इंडोनेशिया (RCTI) वरून काढून टाकण्यात आला आहे.
08 Jan 2026 02:40 PM (IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामाना वडोदरा येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, या न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलने बुधवारी सांगितले की, त्यांचा संघ सध्या टी-२० विश्वचषकाबद्दल विचार करत नाही, जो अद्याप एक महिना दूर आहे, परंतु भारताविरुद्धच्या आगामी मालिकेत भारतीय गोलंदाजांकडून येणाऱ्या आव्हानावर लक्ष केंद्रित करत आहे.
08 Jan 2026 02:30 PM (IST)
US Immigration : वॉशिंग्टन : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. अमेरिके (America) च्या मिनियापोलिस शहरात इमिग्रेशन कारवाईदरम्यान एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE)च्या अधिकाऱ्याने एका महिलेला गोळी झाडून ठार केले आहे. यामुळे मिनेसोटाच्या मिनियापोलिस शहरात संतापाची लाट उसळली आहे. लोकांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शने सुरु केली आहेत.
08 Jan 2026 02:25 PM (IST)
बीड येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मानलेले भाऊ याला आत्महत्येपासून वाचवतांना प्राध्यापिका ८० टक्के जाळल्याची घटनासमोर आली आहे. डॉ. ममता शामसुंदर जखोटिया (राठी) असे प्राध्यापिकाचे नाव आहे. तर मानलेल्या भावाचे नाव धनाजी आर्य असे आहे. ममता राठी या एका नामांकित संस्थेत प्राध्यापिका होत्या. त्यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आधी या दुर्घटनेचा सगळ्यांना घातपाताचा संशय होता. मात्र ममता राठी यांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे.
08 Jan 2026 02:20 PM (IST)
बांगलादेशातील (Bangladesh) अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील अत्याचाराच्या बातम्या सातत्याने समोर येत असतानाच, आता चितगावमधून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. लालखान बाजार परिसरात राहणाऱ्या श्रावंती घोष या अवघ्या १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पद स्थितीत लटकलेला आढळला. ४ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
08 Jan 2026 02:16 PM (IST)
चिपळूण: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास कंपनी बंद होईपर्यंत लढा सुरुच ठेऊया असा निर्धार शहरातील सावकर सभागृहात झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच कंपनीविरोधात ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या गेटवर होणाऱ्या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आली असून शहरातील बहादूरशेखनाका (chiplun) येथून रॅलीला सुरुवात होणार आहे.
08 Jan 2026 02:14 PM (IST)
महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात वाहणारी भीमा नदी ही लाखो नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे आज हीच भीमा नदी आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. विशेषतः राजगुरुनगर शहर व परिसरात भीमा नदीची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. भीमा नदी हजारो वर्षांपासून परिसरातील शेती, पशुधन, पिण्याचे पाणी, भूजल पुनर्भरण आणि जैवविविधतेचा कणा राहिली आहे. नदीकाठची जमीन सुपीक राहण्यामागे भीमेचा मोठा वाटा आहे. अनेक गावांची अर्थव्यवस्था, मासेमारी, शेती आणि पूरक व्यवसाय या नदीवर अवलंबून आहेत. नदी हे नैसर्गिक परिसंस्थेचे केंद्र असून, जलचर, पक्षी, वनस्पती आणि मानव यांचे सहअस्तित्व नदीमुळेच शक्य होते.
08 Jan 2026 01:45 PM (IST)
रशिया (Russia) आणि अमेरिका (America) यांच्यातील संबंध आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. अटलांटिक महासागरात अमेरिकन नौदलाने रशियाचा ‘मरीनेरा’ हा तेल टँकर जप्त केल्याने क्रेमलिनमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. या कारवाईकडे थेट व्लादिमीर पुतिन यांचा वैयक्तिक अपमान म्हणून पाहिले जात असून, रशियन अधिकाऱ्यांनी आता अमेरिकेला अणुबॉम्बने (Nuclear Attack) उडवून देण्याची धमकी दिली आहे.
08 Jan 2026 01:40 PM (IST)
उस्मान ख्वाजाचा निरोपाचा कसोटी सामना भावनिक झाला जेव्हा त्याची पत्नी राहेल स्टँडवरून सिडनी क्रिकेट ग्राउंडकडे पाहत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. ख्वाजाने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा सामना खेळला तेव्हा कॅमेऱ्यांनी हा हृदयस्पर्शी क्षण टिपला, जो त्याच्या दीर्घ कारकिर्दीमागील प्रवास आणि त्यागाचे प्रतिबिंब आहे.
08 Jan 2026 01:35 PM (IST)
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) तोंडावर आल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारामध्ये एकमेकांची उणी -धुणी काढणाऱ्या दोन नेत्यांची भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे. एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांची भेट झाली. या भेटीमुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले असून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
08 Jan 2026 01:30 PM (IST)
आजच्या डिजिटल युगात संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम WhatsApp आहे. WhatsApp नवं नवीन फिचर आणि उपडेट आणत असतो. जेणेकरून वापरकर्त्यांच्या अनुभव सुधारेल. आता पुन्हा एकदा WhatsApp ने वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी 3 नवे दमदार फीचर्स आणले आहेत. ग्रुप चॅट अधिक सोयीस्कर, सुस्पष्ट आणि इंटरॲक्टिव्ह व्हावा यासाठी व्हॉट्सअॅपने तीन नवी वैशिष्ट्ये सादर केली आहेत. चला जाणून घेऊया हे ३ नवीन फिचर कोणते
08 Jan 2026 01:25 PM (IST)
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील पॉवर स्टार पवन सिंग त्याच्या व्यावसायिक आयुष्यात यशस्वी झाला आहे, परंतु त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच काही सहन केले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर, तो अक्षरा सिंगच्या प्रेमात पडला, परंतु काही कारणास्तव त्यांचे नाते टिकले नाही. त्यांचे नाते वाईट टप्प्यावर संपले. त्यानंतर त्याने ज्योती सिंगशी दुसरे लग्न केले, परंतु अवघ्या दोन वर्षांनी त्यांचे नातेही बिघडले, ज्यामुळे घटस्फोट झाला. आता, अभिनेता त्याच्या तिसऱ्या लग्नासाठी चर्चेत आला आहे. अलीकडेच, त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला आणि एका कपाळावर सिंदूर लावलेला महिलेसोबत तो दिसला.
08 Jan 2026 01:15 PM (IST)
आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीने उघडला असून गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. कमकुवत जागतिक संकेतांमध्ये, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही लाल रंगात उघडले. या बाजारातील मंदीचा परिणाम बँकिंग आणि मिड-कॅप समभागांवरही झाला, जे बेंचमार्क निर्देशांकासह कमी व्यवहार करत आहेत. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि आंतरराष्ट्रीय भू-राजकीय घडामोडींचा बाजारातील भावनेवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
08 Jan 2026 01:07 PM (IST)
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल ‘टू बीएचके’ला राज्य उत्पादन शुल्क विभागाने दणका दिला. हॉटेल ‘टू बीएचके’वर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. राजा बहादुर मिल परिसरातील या हॉटेलचा एफएल-3 प्रकारचा मद्यविक्री परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
08 Jan 2026 01:00 PM (IST)
सुरुवातीला २२५ टन हरभरा यशस्वीरित्या पुरवून शेखने व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला. यासाठी पन्नालाल यांनी जबलपूरच्या अंकिता इंडस्ट्रीजच्या खात्यात ९३ लाख रुपये जमा केले होते.
08 Jan 2026 12:50 PM (IST)
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये कार्यरत 24 वर्षीय आयटी अभियंता सुजल ओसवालने ऑनलाइन जुगार व बेटिंगमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेने आयटी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
08 Jan 2026 12:40 PM (IST)
नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत लोखंडी रॉड व चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तंशू नागपुरेचा मृत्यू, तर ऋतिक पटले गंभीर जखमी झाला. पोलीस तपास सुरू आहे.
08 Jan 2026 12:30 PM (IST)
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीत आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती वडिलांना देत असल्याच्या रागातून चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा कुऱ्हाडीने खून केला. आरोपी 24 तासांत अटकेत.
08 Jan 2026 12:25 PM (IST)
ते म्हणाले की, “कालपासून माध्यमांमध्ये बातम्या चालत आहेत की संदीप देशपांडे यांनी पक्ष सोडला. त्यामुळे काही गोष्टी सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी मनसेचं काम करत आहे. मनसेचंच काम मी नीट करत आहे आणि यापुढेही करत राहीन” असे मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले.
08 Jan 2026 12:20 PM (IST)
पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय कातकरी आदिवासी तरुणीला लग्नाचं आमिष देऊन 3 लाखांत विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. गर्भावस्थेत छळ, मारहाण केल्याप्रकरणी पती, सासू व दोन मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल.
08 Jan 2026 12:15 PM (IST)
कन्नड स्टार यशच्या "टॉक्सिक" चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता यशच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. "टॉक्सिक" मधील यशचा लूक अखेर समोर आला आहे.
08 Jan 2026 12:10 PM (IST)
उमरगा बायपासजवळ 35 वर्षीय शाहूराज सूर्यवंशी याची धारदार हत्यार व दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. पत्नी व तिच्या प्रियकराने अनैतिक संबंधातून कट रचल्याचा उलगडा पोलिसांनी 12 तासांत केला.
08 Jan 2026 12:05 PM (IST)
रशियन टँकर जप्त केल्यानंतर ट्रम्प हवेत उडू लागले आहे. त्यांनी रशिया आणि चीन अमेरिकेलाच घाबरतात असा दावा केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
08 Jan 2026 12:04 PM (IST)
संदीप देशपांडे मनसे सोडून जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “कालपासून माध्यमांमध्ये बातम्या चालत आहेत की संदीप देशपांडे यांनी पक्ष सोडला. त्यामुळे काही गोष्टी सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी मनसेचं काम करत आहे. मनसेचंच काम मी नीट करत आहे आणि यापुढेही करत राहीन. माझी हात जोडून विनंती आहे की अशा अफवा पसरवू नका. महापालिका निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यासाठी मी मुंबई अध्यक्ष म्हणून काम करतोय"
08 Jan 2026 11:55 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच त्यांच्या निर्णयामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी विचित्र चाल खेळली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 66 संघटनांमधून अमेरिकेचा सहभाग काढून घेतला आहे.
08 Jan 2026 11:45 AM (IST)
आधुनिक विज्ञानाचे जनक म्हणून संपूर्ण विश्वात आपली ओळख निर्माण करणारे गॅलिलिओ गॅलिली यांची आज पुण्यतिथी. मुळचे इटलीचे असणाऱ्या गॅलिलिओ गॅलिलीने खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला. निरीक्षण, प्रयोग आणि तर्कशुद्ध पद्धतींचा वापर करून खगोलशास्त्र व भौतिकशास्त्रात क्रांती घडवली; त्यांनी दुर्बिणीचा वापर करून गुरूचे चंद्र आणि शुक्राच्या कला शोधल्या, तसेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते या सूर्यकेंद्रित सिद्धांताला पाठिंबा दिला. गॅलिलिओ गॅलिली यांनी दुर्बिणीचा वापर करून अनेक महत्त्वाचे खगोलीय शोध लावले.
08 Jan 2026 11:35 AM (IST)
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर शनिवारी दुपारी १२.३० वाजता सभा होणार आहे. २०१७ साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न सुरू केले असून सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व २६ प्रभागातून १०२ उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत.






