गोंदिया : जिल्हयात खरीप व रब्बी हंगाम २०१९-२० मध्ये धान खरेदी दरम्यान मोठया प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांना दिले होते. धान खरेदीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून फौजदारी व प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली, अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली होती. सात दिवसांत अहवाल सोपविण्याचे आदेश मिळाले. अहवाल देखील प्राप्त झाला. परंतु, कारवाई मात्र झाली नसल्याने प्रकरण दडपण्यात आले की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
[read_also content=”रावणवाडी येथे भाड्याच्या घरात पोलिस ठाणे तर , ७० गावांची जबाबदारी ५५ जवानांच्या खांद्यावर https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/police-stationed-in-a-rented-house-at-ravanwadi-while-the-responsibility-of-70-villages-fell-on-the-shoulders-of-55-jawans-nraa-239026.html”]
मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत जिल्हयात २०१९-२० मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप व रब्बी हंगामात कोटयावधी रुपयांची धान खरेदी करण्यात आली. या धान खरेदीमध्ये मोठयाप्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या तक्रारी मंत्रालयापर्यंत पोहचल्या. जिल्हयातील हे धान खरेदीचे प्रकरण चांगलेच गाजले. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ३० ऑक्टोबर २०२० रोजी च्या पत्रान्वये पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली.
[read_also content=”तयार आहे शुभमंगलचा मंडप, पण जोडपीच नाहीत, महिला व बालविकास विभागाच्या योजनेकडे का फिरविली जातेय पाठ ? https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/the-pavilion-of-shubhamangal-is-ready-but-there-are-no-couples-nraa-238401.html”]