Bal Shivaji Poster – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांसमोर रिव्हील करण्यात आलं आहे. बाल शिवाजीच्या भूमिकेत सैराट फेम सर्वांचा लाडका आकाश ठोसर दिसणार आहे. बाल छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतील आकाश ठोसरचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
आकाश ठोसरने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये तो तरुणपणातील छत्रपती शिवरायांच्या लूकमध्ये दिसत आहे.आकाश ठोसर या चित्रपटात ‘बाल शिवाजी’ ही भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये त्याचा शिवाजी महाराजांसारखा लूक पाहायला मिळतोय. हातात तलवार, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात कवड्यांची माळ आणि भेदक नजर पाहायला मिळत आहे.
“लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो.” महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्त स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचं पहिलं पोस्टर” असं कॅप्शन देत आकाशने हे पोस्टर शेअर केलं आहे.
आकाशच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसंच मराठी इंडस्ट्रीतील रवी जाधव, अक्षय वाघमारे, शिव ठाकरे यांनी कमेंट्स करत आकाशला नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
[read_also content=”TDM सिनेमा पुन्हा रिलीज होणार ! एकच सिनेमा दोन वेळा प्रदर्शित होण्यामागचं राजकारण काय? https://www.navarashtra.com/entertainment/tdm-movie-release-9-june-411429/”]
लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी मागील वर्षीच त्यांच्या ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोकर ‘बाल शिवाजी’च्या भुमिकेतून दिसणार आहे. त्याचा लुक समोर आला असून या लुकमध्ये तो उठून दिसतो आहे. या पोस्टखाली चाहते सकारामत्मक कमेंट्स करताना दिसत आहेत.अनेकांना आकाशचा हा लुक प्रचंड आवडला आहे.
रवी जाधव यांचे तीन चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनचा’ताली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचाही फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर आला आहे. तसंच, भव्यदिव्य चित्रपट ‘अटल’ हा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. या चित्रपटातून भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका अभिनेते पंकज त्रिपाठी साकारणार आहेत. आता त्यांनी आपल्या ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाचाही लुक सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.