नवराष्ट्र न्यूज़ नेटवर्क, दिल्ली : भारत सरकार (Central Government) आणि सोशल मीडिया कंपनी (social media company) ट्विटरमध्ये (twitter) खटके उडाले आहेत. भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करणाऱ्या ट्विटसना केंद्र सरकारने सणसणीत उत्तर दिले आहे. इतर गोष्टी सोडून ट्विटरने आदेशाचे पालन करावे, असे सरकारने कंपनीला दटावले आहे. ट्विटरचा धमकावल्याचा आरोप निराधार आणि पूर्णपणे खोटा आहे.
[read_also content=”खराब हवामानामुळे गिर्यारोहकांची झालीये दैना; ना धड वरही जाता येईना की, खालीही येता येईना https://www.navarashtra.com/latest-news/with-kasturi-other-climbers-are-safe-at-camp-two-in-everest-the-situation-on-everest-nrvb-135204.html”]
ट्विटर जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीवर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्न करत आहे. जाणूनबुजून सरकारच्या आदेशाचे पालन न करून कायदा- सुव्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया कंपन्यांचे प्रतिनिधी भारतात सुरक्षित होते आणि पुढेही राहतील, असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
After WhatsApp the government took to Twitter The company must obey the order