लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात (Voting Begins) झाली आहे. आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी पहिलं मतदान केलं. यावेळी त्याने त्याच्या चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं देखील आवाहन केलं.
[read_also content=”निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत बॉलिवूडमधून निवृत्ती घेणार का? कंगणाने केला मोठा दावा, https://www.navarashtra.com/movies/kangana-ranaut-claims-she-will-quit-the-bollywood-if-wons-the-mandi-lok-sabha-election-2024-535353.html”]
आज सकाळपासून मुंबईत मतदानाला सुरुवात झाली आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार सकाळपासून मतदान केंद्रावर मत देण्यासाठी जाताना दिसत आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कुमार, फरहान अख्तर, सान्या मल्होत्रा, परेश रावल आणि जान्हवी कपूर यांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केलं. मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या सेलेब्रिटींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.