बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी (Amitabh Bachchan bought an office) अंधेरी पश्चिम येथे एकूण 28.7 कोटींना कार्यालय खरेदी केलं आहे. 2,099 चौरस फुटांचं हे कार्यालय असून वीरा देसाई रोडवरील सिग्नेचर बिल्डिंगमधील वीर सावरकर प्रोजेक्ट्समधून ही मालमत्ता खरेदी केली आहेत. अमिताभ बच्चन यांनी मालमत्तेच्या नोंदणीसाठी 1.72 कोटी रुपये मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरले.
[read_also content=”आयआयटी-बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना लागली लॅाटरी, प्लेसमेंट दरम्यान विदेशी कंपन्याकडून वार्षिक ३.७ कोटी रुपये वेतनाची ऑफर! https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/iit-bombay-conclude-phase-1-placement-highest-salary-3-7-cr-rs-3-7-crore-annual-salary-for-overseas-placement-at-iit-bombay-455577.html”]
सध्या अमिताभ बच्चन यांचा टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ प्रसारित झाला आहे. या शो प्रेक्षकांची चांगली पंसती मिळत असून शो ला नुकताच त्यांचा पहिला करोडपती मिळाला आहे. अमिताभ यांनी या मालमत्तेसाठी 1.72 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले असून मालमत्तांमध्ये प्रत्येकी तीन पार्किंग स्लॉट असल्याची माहिती समोर आली आहे. या मालमत्तांची नोंदणी 1 सप्टेंबर रोजी झाली.
अमिताभ बच्चन यांनी ज्या टॉवरमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. त्याच टॉवरमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी ऑफिसची जागा खरेदी केली आहे. अजय देवगण आणि काजोलने यावर्षी याच प्रोजेक्टमध्ये काजोलने त्याच टॉवरमध्ये 7.64 कोटी रुपयांना ऑफिस खरेदी केले होते, असे इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.
कार्तिक आर्यनने 10 कोटी रुपयांमध्ये 2100 स्क्वेअर फूट ऑफिसची जागा घेतली. तर, सारा अली खान आणि अमृता सिंग यांनी मिळून एक ऑफिस 9 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अमिताभ बच्चन यांचे ऑफिस २१ व्या मजल्यावर आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचे युनिट चौथ्या मजल्यावर आहेत.