कामानिमित्त बाहेर जाताना किंवा कोणत्या कार्यक्रमात जाण्यासाठी महिला कॉटन साडीची निवड करतात. कॉटन साडी अतिशय आरामदायी वाटते. वर्षाच्या बाराही महिने तुम्ही कॉटन साडी नेसू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेत डिझाइनर किंवा हेवी फॅब्रिक असलेली साडी न नेसता महिला कॉटन साडी नेसतात. कॉटन साडी अंगावर अतिशय चापून चोपून बसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॉटन साडीचे काही सुंदर प्रकार सांगणार आहोत. या फॅब्रिकमधील कॉटन साडी प्रत्येक महिलेच्या कपाटात असायलाच हवी. (फोटो सौजन्य: Pinterest)
सर्वच ऋतूंमध्ये कम्फर्टेबल वाटतील कॉटन साडीचे 'हे' प्रकार
कॉटन साडीमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील सगळ्यांना आवडणारा प्रकार म्हणजे वारली प्रिंट असलेली एकरंगी साडी. सणावाराच्या दिवसांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही वारली प्रिंट असलेली साडी नेसू शकता.
कॉटनमधील इंडिगो साडीची अजूनही महिलांमध्ये मोठी क्रेझ आहे. निळ्या रंगाच्या इंडिगो साडीवर तुम्ही कोणत्याही रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता.
काहींना एकरंगी साडी नेसायला खूप जास्त आवडते. नाजूक बॉर्डर किंवा बुटी वर्क करून तयार केलेली कॉटन साडी सणावाराच्या दिवसांमध्ये सुंदर आणि स्टयलिश लुक देते.
गोल्डन बॉर्डर असलेली माहेश्वरी कॉटन साडी किंवा नारायणपेठ साडी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. नारायणपेठ साडीमध्ये अनेक वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत. या साडीवर बॉर्डर सगळ्यांचं आकर्षित करते.
कामानिमित्त बाहेर जाताना किंवा ऑफिसच्या कोणत्या कार्यक्रमात तुम्ही कॉटनची या डिझाईनची साडी नेसू शकता. यामध्ये तुमचा लुक स्टयलिश आणि सुंदर दिसेल. कलामकारी साडीमध्ये अनेक वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत.