भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे, जे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत चालते. देशात ७ हजाराहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. देशाच्या प्रत्येक शहरांमध्ये किमान एक रेल्वे स्टेशन तरी नक्कीच आहे पण आज आम्ही तुम्हाला जगातील अशा देशाविषयी माहिती सांगत आहोत जिथे संपूर्ण देशात फक्त एकाच रेल्वे स्थानक आहे. इथे हजारो प्रवासी फक्त एका रेल्वे स्टेशनने प्रवास करतात. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जमिनीपासून ४३ फूट खोल बोगद्यात बांधण्यात आलंय देशातील एकमेव रेल्वे स्टेशन; फक्त ४० हजार लोकसंख्या आणि हा देश नक्की आहे तरी कोण?
या देशाचं नाव मोनाको रेल्वे स्टेशन असून हा फ्रान्सजवळ स्थित युरोपमधील युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. या देशात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे ज्याचे नाव मोनाको-मोंटे कार्लो आहे.
मोनाको-मोंटे कार्लो स्टेशन मोनाको देशातील एकमेव रेल्वे स्टेशन असून दररोज इथून २० ते ३० गाड्या धावतात. हे रेल्वे स्टेशन तब्बल ४३ फूट खाली बांधलेले असून ते एक भूमिगत बोगद्यात बांधण्यात आले आहे. याची लांबी १,५२९ फूट असून रुंदी ७२ फूट आहे.
फक्त ४० हजार लोकसंख्या आणि १.९५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह हा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे.
देश लहान असला तरी या देशातील लोकांचे उत्पन्न खूप जास्त आहे. इथे प्रत्येक व्यक्तीची एकूण संपत्ती १ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे ८,३४,५९,१०० रुपये आहे.
देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करोडपतींच्या या देशात लोकांना इन्कम टॅक्सदेखील भरावा लागत नाही.