कोरोना प्रतिबंधासाठी भारत बायोटेकने तयार केलेल्या पहिल्या स्वदेशी कोव्हॅकसीन लसीमध्ये गायीच्या बछड्याच्या रक्तातील पातळ द्रव (सिरम) चा वापर केल्याच्या खुलाशानंतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरणे हा राजकीय डावपेचाचा भाग असल्याचे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात संशोधकांनी असा खुलासा केला आहे की, जेव्हा एखाद्या विषाणू विरुद्ध लस तयार केली जाते तेव्हा प्राथमिक पातळीवर घोडे, रेडे, म्हशी अथवा अन्य प्राण्यांच्या ई सिरमचा वापर गेली कित्येक दशके सर्वच देशातून केला जात आहे.
मेडिकल सायन्स मध्ये ही प्रथा फार जुनी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ, देशात कोव्हॅक्सिन वरून सुरू झालेल्या वादाने हैराण झाले आहेत. कसौली सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी प्रमुख प्रो. राकेश सहगल या संदर्भात बोलताना म्हणाले, कोणतीही लस तयार करण्यासाठी अगोदर पेशी तयार कराव्या लागतात. त्याला सेल्स लाईन म्हटले जाते. या पेशी वाढविण्यासाठी सिरमची आवश्यकता असते आणि ते प्राण्यांमधून घेतले जाते.
[read_also content=”हा कोरोनाचा तिसरा डाव तर नाही ना? मुंबईतील कोरोना संसर्ग आणखी घटला; आता लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडे लक्ष https://www.navarashtra.com/latest-news/third-wave-local-trains-may-get-green-signal-corona-positivity-rate-in-mumbai-below-4-percent-nrvb-144034.html”]
ज्या पेशींची न्युट्रिशनल व्हॅल्यू जास्त असेल अशा पेशी यासाठी लागतात आणि प्राण्यांमध्ये त्या अधिक असतात. पोलिओ, रेबीजसारख्या लसी तयार करतानासुद्धा प्राण्याच्या सिरमचा वापर केला गेला आहे. कारण यातूनच सुरक्षित लस तयार होते. अंतिम प्रक्रियेत म्हणजे जेव्हा लसीचे मोठे उत्पादन सुरू करण्याची वेळ येते तेव्हा त्यात कुठलेच सिरम शिल्लक राहत नाही. कारण सिरम शिल्लक राहिले तर लस तयारच होऊ शकत नाही.
Animal serum used for vaccines Find out the exact reason