Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, तरी सगळे ६० आमदार…; मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांची नाराज

“माझ्या हाती काहीच नाहीये. हे प्रश्न शिंदे आणि फडणवीसांना विचारले पाहिजेत. माझ्याकडे दोन आमदार आहेत. दोन आमदार असणाऱ्या माणसाला मंत्रीमंडळ ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. याचे एक घाव दोन तुकडे करून टाकायला पाहिजेत. हो किंवा नाही.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 07, 2023 | 07:56 PM
मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, तरी सगळे ६० आमदार…; मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांची नाराज
Follow Us
Follow Us:

मुंबई – राज्य मंत्रीमंडळ विस्तार. आधी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असलेल्या मंत्रीमंडळाने कारभार पाहिल्यानंतर आत्तापर्यंत फक्त एकच मंत्रीमंडळ विस्तार झालेला आहे. अजूनही २३ मंत्रीपदं रिक्त असून सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळाचा विस्तार प्रलंबित आहे. त्यासंदर्भात सातत्याने पुढची तारीख मिळत असताना आता सरकारमधील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे.

प्रहार संघटनेच बच्चू कडू यांनी यांदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत केलेल्या एका विधानासंदर्भात विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यावरून शिंदे सरकारला खोचक सल्ला दिला आहे. “मंत्रीमंडळ विस्तारामध्ये तांत्रिक अडचणी असून येत्या १५ तारखेपर्यंत या अडचणी दूर होतील आणि २१-२२ तारखेपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होईल. सगळ्याच आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले होते.

“जर विस्तार नसेल होत तर स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच आमदारांची कुजबूज सुरू आहे. आणि जर विस्तार होत असेल, तर तो सरळ सरळ लगेच करून घ्यावा. जे काही असेल ते एक घाव, दोन तुकडे करायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे”, असं बच्चू कडू म्हणाले

“माझ्या हाती काहीच नाहीये. हे प्रश्न शिंदे आणि फडणवीसांना विचारले पाहिजेत. माझ्याकडे दोन आमदार आहेत. दोन आमदार असणाऱ्या माणसाला मंत्रीमंडळ ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. याचे एक घाव दोन तुकडे करून टाकायला पाहिजेत. हो किंवा नाही.

फडणवीस म्हणत होते अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार करू. नंतर अधिवेशन झालं. त्यात तांत्रिक अडचण असू शकते. आमची काय त्याबद्दल नाराजी नाही. पण माझं म्हणणं आहे की स्पष्टपणे सांगून टाकायला हवं. प्रमुख लोकांनी हे स्पष्टपणे सांगायला हवं. त्याबाबतचा जनतेमधला संभ्रम दूर करायला हवा”, असंही बच्चू कडू म्हणाले.

Web Title: Bachchu kadu mocks eknath shinde government on cabinet expansion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2023 | 06:48 PM

Topics:  

  • BJP
  • Cabinet Expansion
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • Shinde government

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.