संपुर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या पुष्पा (Pushpa) चित्रपटातील ओ अंटावा गाणं (Pushpa O Antava Song) समंथा प्रभूच्या बोल्ड डान्समुळे लोकांच्या ओठी अजुनही आहेच. या गाण्यामधील समंथाच्या हटके अंदाजाने फक्त साऊथला नाही तर अख्या देशाला वेड लावलं आहे. पण हे गाणं समंथा प्रभू (Samantha Prabhu) च्या आधी बॅालिवुडच्या दिलबर गर्ल नोरा फतेही (Nora Fatehi) ला ऑफर झाले होते. अशी माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार कसलेले कलाकार, कथा, सशक्त व्यक्तिरेखा आणि गाणे यामुळे पुष्पा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहे. आता चित्रपट प्रदर्शित होऊन 2 महिने होत आहेत पण तरीही चित्रपटानं चाहत्यांच्या हृदयावर आणि मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. अल्लू अर्जुनची सिग्नेचर स्टेप असो किंवा ओ अंटावा गाण्यात सामंथा प्रभूचा किलर परफॉर्मन्स असो. चाहते अजुनही वेडे होत आहेत. मात्र, सगळ्यांना वेड लावणारं हे गाणं आधी सामंथा प्रभूला नाही तर नोरा फतेहीला ऑफर करण्यात आलं होतं.
[read_also content=”मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : सतरावा साक्षीदार फितूर, खोटी साक्ष देण्यासाठी एटीएसचा दबाव असल्याचा खुलासा https://www.navarashtra.com/maharashtra/17th-witness-turns-hostile-claims-that-ats-force-him-to-take-rss-leaders-name-nrsr-232095.html”]
ओ अंटावा गाण्यात सामंथा प्रभूचा बोल्ड अवतार पहायला मिळाला. यातील संमथाच्या बोल्ड लूक आणि हटक्या अंदाजाची बरीच चर्चा झाली. गाण्याचे बोलही फार बोल्ड होते. त्यामुळे या गाण्याला लोकांनी डोक्यावर घेतलं.पण हे गाणं आधी नोरा फतेहीला ऑफर करण्यात आलं होतं. पण तिने नकार दिला त्यानंतर हे गाणं समंथाने केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा हे गाणे नोरा फतेहीला ऑफर करण्यात आले तेव्हा नोरानं यासाठी मोठी फी मागितली होती. जे देण्यास निर्माते तयार नव्हते, त्यामुळे नोरानं हे गाणं करण्यास नकार दिला. त्यानंतर हे गाणं नोराशिवाय अभिनेत्री दिशा पटनीलाही ऑफर करण्यात आलं होतं. पण दिशा पटनी एक अभिनेत्री आहे आणि तिने कदाचित यामुळेच साऊथ चित्रपटात आयटम नंबर करायला नकार दिला असावा. त्यानंतर हे गाणे सामंथाकडे गेले आणि अल्लू अर्जुनमुळे तिने या गाण्याला होकार दिल्याचं सांगितलं जातं आणि हे गाणं संमथानं केल्यानंतर त्याची जादू सगळीकडे दिसतच आहे.
[read_also content=”सर्व व्यवसाय सुरु, पण साऊंड सिस्टिमवर अजून बंदी का?; अवधूत ढेरेंचा सवाल https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/solapur/all-business-started-but-why-a-further-ban-on-sound-systems-avadhut-dhere-raise-issue-nrka-234179.html”]
‘पुष्पा: द राइज’ मध्ये अभिनेता अल्लू अर्जुन आणि मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. जगभरात पुष्पाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि तो २०२१ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. हा चित्रपट बहूभाषिक असून दक्षिण हिंदी, कन्नड, तेलगू सारख्या अनेक भाषांमध्ये Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आहे.
[read_also content=”शंभर रुपये दिले नाही म्हणून त्याने चक्क केला मित्राचा खून, पोलीस नियंत्रण कक्षामध्ये फोन करुन दिली भलतीच माहिती https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/friend-murdered-his-own-friend-for-not-giving-100-rupees-nrsr-234124.html”]






