
ठाकरे बंधूंवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा
दहशत निर्माण करण्याची क्षमता नसल्याची तिला
मुंबई महापालिकेसाठी आज सुरू आहे मतदान
BMC Election 2026: आज राज्यात 29 महानगरपालिकांसाठी मतदान सुरू आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची समजली जात आहे. भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान आज मुंबईत मतदान यंत्र बंद पडणे, बोटावरची शाई पुसली जाण्याचे काही प्रकार समोर आले आहेत. यातच आता ठाकरेंनी तैनात केलेल्या ‘भगवा गार्ड’वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई महापालिकेत दुबार मतदान होऊ नये यासाठी अनेक मतदान केंद्रावर ठाकरे बंधू यांनी ‘भगवा गार्ड’ तैनात केले आहेत. दुबार मतदार शोधण्याचे काम यांच्यावर देण्यात आल्याचे समजते आहे. दरम्यान भगवा गार्ड काही ठिकाणी पोलिसांना देखील भिडल्याचे म्हटले जात आहे. ‘भगवा गार्ड’ दुबार मतदार शोधण्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे. दरम्यान भगवा गार्ड पोलिसांना भिडल्याचे देखील समोर आले आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टठाकरे बंधू यांनी जी ‘भगवा गार्ड’ ब्रिगेड तयार केली आहे, ती मुंबई काही विशिष्ठ ठिकाणी दिसून येत नाहीये. ठराविक भागात त्यांना दहशत निर्माण करायची आहे का? दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ठराविक ठिकाणीच करायचा आहे का? यांची आता दहशत निर्माण करण्याची ताकद उरलेली नाही. कोणी दहशत निर्माण केल्यास पोलिस ठोकून काढतील. मतदान कमी झाले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहेट, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर
‘पैज लावून सांगतो’ असे म्हणत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान होत असून उद्या मतमोजणी पार पडणार आहे. निकाल जाहीर होण्याआधीच त्यांनी भाजपच्या संभाव्य जागांबाबत भाकीत मांडले आहे. मुंबई महापालिकेत भाजपला 90 जागा मिळतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. पुण्यात 165 पैकी 115 जागा भाजप जिंकेल, असे ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये 62, सांगलीत 55, तर इचलकरंजीत 65 पैकी 48 जागांवर भाजपचा विजय होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हे भाकीत कितपत खरे ठरणार, हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.