Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर

एक-दोन ठिकाणी ईव्हीएम मशीनचा तांत्रिक बिघाड वगळता दुपारी साडेतीन पर्यंत कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी ६५ टक्के मतदान झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 15, 2026 | 04:23 PM
कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर

कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर
  • दुपारी साडेतीनपर्यंत ६५ टक्के मतदान
  • सतेज पाटलांचा विरोधकांवर निशाणा
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. एक-दोन ठिकाणी ईव्हीएम मशीनचा तांत्रिक बिघाड वगळता दुपारी साडेतीन पर्यंत कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी ६५ टक्के मतदान झाले. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, भाजपा खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील यशवंतराव पाटील विद्यामंदिराच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर टीका केली. “महायुती विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेसला चांगले यश महाराष्ट्रात सर्व महापालिकेत मिळेल. महाराष्ट्रात महायुती स्वतंत्र लढत आहे. मात्र कोल्हापुरकरांच्या भीतीमुळं कोल्हापुरात महायुती एकत्र आले आहेत. भाजपा- महायुतीकडे प्रंचड पैशाची ताकद आहे, दडपशाही आहे. आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यापर्यंत मजल गेली आहे. शेवटच्या २४ तासांत आमच्या कार्यकर्त्यांना उचलून नेण्याचा प्रयत्न झाला, तो आम्ही हाणून पाडला. मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा नेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या दडपशाहीला कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर आणि काँग्रेसवर विश्वास दाखवतील, ” अशा शब्दांत सतेज पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

पुढं ते म्हणाले की, “भाजपा महायुतीने चांगले काम केले असेल तर मग दडपशाहीचं त्यांनी राजकारण करू नये. मतदान केंद्रावर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या आहेत. मात्र प्रशासन त्याच्यावर तातडीनं उपाययोजना करत आहे. कोल्हापुरातल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर जनतेचा विश्वास नाही. त्यामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना येवून कोल्हापूरकरांना विश्वास द्यावा लागला. एवढी वेळ त्यांच्यावर आली आहे, या लढाईत कोल्हापूरकर माझ्याबरोबर असतील. मतदार यादीतील घोळ अजूनही प्रचंड आहे. तो आम्ही निदर्शनास आणून दिला आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार केंद्र बनवली आहेत. पूर्ण नियोजन प्रशासनानं आपल्याला त्रास होवू नये असे केले आहे. एवढी वर्ष निवडणूक आयोग मतदान घेते. त्यासाठी महाराष्ट्र शासन पैसे देते. त्यामुळे अपडेट होणं गरजेचं आहे. मतदार यादीत आमदारांची नावं नसणं हे लोकशाहीचं दुर्दैवं आहे. मतदार यादी दोषयुक्त आहे की दोषमुक्त नाही, हे यावरून स्पष्ट होते. कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले तरी कोल्हापूरकर सुज्ञ आहेत ते माझ्याबरोबर आणि काँग्रेसबरोबर राहतील,” असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनीही काँग्रेसवर निशाणा साधत कोल्हापूरची जनशक्ती महायुतीसोबत राहील, असं म्हटले आहे. “राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी होतील. महापालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल. आज माझा वाढदिवस साजरा करणार नाही. उद्या महायुतीच्या विजयच माझा वाढदिवस असेल तर १५ जानेवारी काँग्रेस कायमचं घरी अशी टॅगलाईन लागलेली उद्या तुम्हाला दिसेल.

सतेज पाटलांच्या टिकेला महत्त्व देण्याची गरज नाही, त्यांच्या मानसिकतेवर थोडा ताण आला आहे. सतरंज्या उचलण्याचे काम कायमपणाने कार्यकर्ते करतात. आम्हीही केले आहे. कोल्हापुरात काँग्रेसला उमेदवार मिळणेही मुश्किल झाले होते. तीन ठिकाणी एकाच घरात उमेदवारी तर मुलाला आणि मुलीला उमेदवारी देण्याचं काम काँग्रेसनं केले आहे. सतेज पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यात प्रचंड पैशाचं वाटप झाले. तुमचं चांगलं काम असेल तर पैसे वाटण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे. त्यामुळे कोल्हापूरची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच राहील. तसेच कोल्हापूरची जनशक्ती महायुतीसोबत राहील,” असेही खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

हे सुद्धा वाचा : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त

कोल्हापूर महापालिकेसाठी आज सकाळी खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह माजी आमदार मालोजीराजे, छत्रपती मधुरिमा यांनी कोल्हापुरातील नवीन राजवाडा मराठी शाळा या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी, “चांगले आणि सक्षम उमेदवार या निवडणुकीत निवडून यावेत,” अशी अपेक्षा खासदार शाहू छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केली. दुसरीकडे, भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी रुईकर कॉलनी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. तर काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावड्यातील यशवंतराव पाटील विद्यामंदिर मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Citizens have voted in large numbers for the kolhapur municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • kolhapur
  • Kolhapur Election
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

Municipal Election Result 2026: …अन् मतदानाचा दिवस ठरला शेवटचा! मतदानाचा हक्क बजावतना मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
1

Municipal Election Result 2026: …अन् मतदानाचा दिवस ठरला शेवटचा! मतदानाचा हक्क बजावतना मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

PMC Election 2026 : पुण्यात मतदानादरम्यान ईव्हीएम बदलण्याचे सत्र; 20 कंट्रोल युनिट अन्…
2

PMC Election 2026 : पुण्यात मतदानादरम्यान ईव्हीएम बदलण्याचे सत्र; 20 कंट्रोल युनिट अन्…

PMC Election 2026 : पुण्यात शिवसेनेचा मतदान केंद्राबाहेर गदारोळ; बोगस मतदार असल्याचे म्हणत राडा, पोलिसांची मध्यस्थी
3

PMC Election 2026 : पुण्यात शिवसेनेचा मतदान केंद्राबाहेर गदारोळ; बोगस मतदार असल्याचे म्हणत राडा, पोलिसांची मध्यस्थी

PMC Municipal Election 2026: लाडकी बहीण योजनेमुळे वारं फिरणार? पुणे महापालिका निवडणूक नव्या वळणावर
4

PMC Municipal Election 2026: लाडकी बहीण योजनेमुळे वारं फिरणार? पुणे महापालिका निवडणूक नव्या वळणावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.