नागपूर (Nagpur). उपराजधानीत शनिवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, (According to a report received from the health department) कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत (the number of corona positive patients) मोठी घट झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात शनिवारी १५१० नवीन कोरोना रुग्ण (new corona patients) आढळून आले आहेत. यामध्ये ७७४ रुग्ण शहरी भागातील (from urban areas) तर, ७२४ रुग्ण ग्रामीण भागातील (from rural areas) आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या (The number of out-of-district patients) १२ इतकी नोंदविण्यात आली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे दगावल्यांची संख्या ४८ इतकी होती. यामध्ये शहरातील २२ आणि ग्रामीण भागातील १४ तसेच १२ मृत व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत.
[read_also content=” राज्यात ३४,८४८ नवीन रुग्णांचे निदान; मुंबईत दिवसभरात १४५० नवीन कोरोना रुग्ण आढळले https://www.navarashtra.com/latest-news/diagnosis-of-34848-new-patients-in-the-state-in-mumbai-1450-new-corona-patients-were-found-in-a-day-nrat-129474.html”]
आरोग्य विभागाकडून आज ११ हजार ६११ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील १००८१ आणि ग्रामीण भागातील १५३० व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४७८० रुग्णांना मनपाच्या आरोग्य विभागाकडून सुटी देण्यात आली.
सध्या नागपूर जिल्ह्यात ३३५२९ कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.६२ लाख आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची शनिवार पर्यंतची आकडेवारी ८५२० इतकी नोंदविण्यात आली आहे.